Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsहॉट ब्रँच साठी किल्लारी.... साहेब आले आमदार दारीं... करा त्यांच्या साठी LCB...

हॉट ब्रँच साठी किल्लारी…. साहेब आले आमदार दारीं… करा त्यांच्या साठी LCB ची वारी….

चंद्रपूर (16 जानेवारी 2025)
सुशांत घाटे
पोलीस विभागातील जिल्ह्यातील हॉट ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LCB साठी जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षक यांनी आमदार वारी सुरु केली असल्याची विश्वासनीय माहिती सूत्रा न कडून येत आहे.
हल्लीचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर यांचा कार्यकाळ फरवरी महिन्यात पूर्ण होत असल्याने LCB च्या ठिकाणी आपली वर्णी लागावी या साठी त्या दोन पोलीस निरीक्षकांनी प्रयत्न सुरु केले आहे.
राजकीय आरसा घेऊन जिल्ह्याच्या हॉट ब्रँच ला बसण्याचे त्या दोन पोलीस निरीक्षका सोबत आणखी एका पोलीस निरीक्षकांचे स्वप्न झळकत आहे.
गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या कारवाया करीत गुन्हेगारी क्षेत्राला जबर धक्का देत मोडीस काढले आहे. पोलीस अधीक्षक मुंम्मका सुदर्शन यांनी वेळोवेळी सूचना देत ऍक्शन प्लॅन तयार करीत जिल्हायातील पोलीस विभागाला ऍक्टिव्ह मोडवर आणले आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील दोन पोलीस निरीक्षक तर राजुरा विधानसभा क्षेत्रातील एका पोलीस निरीक्षक सध्या स्थानिक गुन्हे शाखे मध्ये विराजमान होण्याकरीता शर्यतीचे प्रयत्न चालवत आहे.या शर्यती मधुन एका पोलीस निरीक्षकाला नुकताच मोठा झटका पडल्याने ते बाहेर झाले नाहीतर त्यांचे नाव प्रथम क्रमांकावर असल्याचे बोलल्या जात होते. नाहीतर LCB साठी चार पोलीस निरीक्षकांची फील्डिंग सुरु असती?
कोणाच्या खांद्यावर जवाबदारी चे ओझं द्यायचे हे सरते शेवटी पोलीस अधीक्षक यांच्यावर अवलंबून आहे. मात्र राजकीय प्रयोग तत्वावर आपले जीवन मान उंचावणारे खरंच कायद्याचे भान ठेवणार का हा मोठा प्रश्न आहे?
राजकीय आश्रय घेऊन मग हा… जी.. हा.. जी… करण्या पेक्षा स्वतःच्या कार्य तत्परता वर जवाबदारी घेणे कधीही योग्य राहणार हे तितकेच खरे!
या प्रयत्नात एक पोलीस निरीक्षक चल अकेला करीत जवाबदारी घेण्याचे सुद्धा धाडस करीत आहे. राजकीय पार्श्वभूमी कशाला स्वतःच्या कार्यतत्परतेने विश्वास दाखवत आहे. पण सध्या त्या दोन पोलीस निरीक्षकांची चांगलीच चर्चा सुरु आहे.

“साहेब आले आमदार दारीं… करा त्यांच्या साठी LCB ची तैयारी “

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!