मुंबई /चंद्रपूर
29 मे 2025🏵️चंद्रपूर जिल्ह्यातील मद्द्य परवाने मंजूर मध्ये अनियमितता, गैरव्यवहार आणी लाचखोरीच्या प्रकरणाचा सखोल तपासाकरीता विशेष तपास पथकाने (SIT) राज्य शासनाच अहवाल देण्याकऱीता तीन महिन्याची मुदत वाढ मागितली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून राज्य उत्पादन शुल्क विभागातील कागदपत्रांची पडताडणी अद्याप सुरूच आहे. अर्जदारांचे बयान नोंदविणे तसेच 08/06/2021 च्या नंतर वितरित करण्यात आलेल्या अबकारी परवान्यवर आक्षेप आणी इतर बाबींच्या चौकशी करण्याकरिता मुदत वाढीचे पत्र देण्यात आले होते.त्यां अनुषंगाने शासनाच्या विचाराधीन असलेल्या या चौकशी समिती ला (SIT) ला 31 /07/2025 पर्यंत मुदतवाद देण्यात आली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.


