Tuesday, August 25, 2026
HomeBreaking Newsहफ्ता खोरीचे लागले व्यसन? दरमहा 10 लक्ष रुपयाचा डल्ला मारीत निरीक्षकाची वसुली?

हफ्ता खोरीचे लागले व्यसन? दरमहा 10 लक्ष रुपयाचा डल्ला मारीत निरीक्षकाची वसुली?

चंद्रपूर 13 जुलै
सुशांत घाटे
कितीही भ्रष्टाचार संबंधी जनजागृती केली तरीही काही भ्रष्टाचारी सुधरण्याच्या पलीकडेच आहे? त्यांना लागलेली कीड म्हणजे आर्थिक हाथगोंडा झाला आहे,

हे च सध्या प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्याकडून दिसत आहे?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन मोठ्या मास्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकडून,

शाही ही सुखली नसताना, परत त्याच विभागातील अभिनंदन कांबळे हे युद्ध पातळीवर महिन्याला राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तसेच मूल तालुक्यातून अवैध हफ्ता वसुली करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे? देशी, विदेशी, बियर शॉपी यांच्याकडून या सर्व भागातून जवळपास 10 लक्ष रुपयाचे हफ्ते गोळा करण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक या पदावर कार्यरत,
अभिनंदन कांबळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्यांनी आपली पोस्टिंग दक्षिणा देत चंद्रपूर जिल्ह्यात करून घेतली असल्याचे त्यांच्यास जवळच्या सूत्राने सांगितले?

निवडीच्या् ठिकाणी पोस्टिंग घेत महिन्याला आल्या बरोबर सुरवात करीत हफ्तेखोरी या अधिकाऱ्याने सुरु केली असल्याचा या वर थेट आरोप करण्यात येत आहे?

विशेष म्हणजे यांच्या च भागातील काही दारू व्यवसायकांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, महिन्याची पाच तारीख आली की एखाद्या लाईट बिल सारखं याचा माणूस किंव्हा फोन द्वारे महिना भरल्याचा अलार्म दिल्या जातो?आणि दहा तारखे पर्यंत आजूबाजूचे कलेक्शन करून ठेवण्यास सांगतो आपल्या सोयीनुसार हा अधिकारी खासगी वाहणाने येऊन संपूर्ण रक्कम घेऊन जातो?
गेल्या एक वर्षा पासून अभिनंदन कांबळे हे या ठिकाणी आपले जाळे मांडून बसले आहे. दरमहा ते कोल्हापूर ला रवाना होत असतात. महिन्याकाठी अवैध मार्गातून केली जाणारी हफ्ते खोरी ला चालना देणाऱ्या या अधिकाऱ्याच्या मुळाशी आणखी कीती खोलवर पाणी मुरले आहे?हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

  • पन दारू व्यावसायिक या अधिकाऱ्याच्या दरमहा घेतल्या जाणाऱ्या हफ्ते खोरी ने नाराजीचा सुर उमटवत आहे? अभिनंदन कांबळे यांनी चंद्रपुरात ACB चा राज्य उत्पादन शुल्क विभागात पडलेला ट्रॅप ची धडकी घेत बदली साठी अर्ज केले होते, मात्र वातावरण शांत झाल्याचे पाहून पुन्हा एकदा कांबळे आता बदलून न जाण्याच्या मनःस्थिती त आले आहे?….आणि येणारही कारण महिन्याकाठी दहा लक्ष रुपयाचा डल्ला तर इथेच भेटणार न ?
  • डेली पोस्ट मार्टम ला याच विभागातील कर्मचाऱ्यांनी अधिकारी कुठून कसा वसुली करतो, आणि कशी बांधणी करतो,याचा विस्तृत डाटा च सांगितला आहे. लवकरच या संधर्भात सुद्धा वृत्त प्रसारित केले जाणार आहे. पण अशा अधिकाऱ्यांना जर वटणीवर आणायचे असेल तर आवाज उठवणे हे गरजेचे आहे.
  • अशा अधिकाऱ्यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करा जेणे करून मुखवटा घेऊन फिरणाऱ्या अशा हफ्ते खोरी अधिकाऱ्यांचा चेहरा समोर येईल? जनाची मनाची लाज न बाळगाणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची कुठलीही भ्रष्टाचार संबंधी तक्रार असेल तर डेली पोस्ट मार्टम ला कळवा आपली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल आणि भ्रष्टाचार संबंधी कथित अधिकाऱ्यांची पोलखोल करण्यात येईल.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!