Thursday, August 27, 2026
HomePoliticsअजुन मनाने हरलो नाही! पुन्हा एकदा कडकडाट करणार!

अजुन मनाने हरलो नाही! पुन्हा एकदा कडकडाट करणार!

चंद्रपूर 8 जुलै – सुशांत घाटे

SPECIAL REPORT

मी मनाने अजुन हरलो नाही ‼️🐅🐅🐅

💥💥💥👇👇👇👇
🐅”मी लढलो आणि लोकसभा निवडणुकीत हरलो ” मात्र मनाने अजुन हरलो नसून पुन्हा माझा आत्मविश्वास दृढ झाला आहे.
विजय – पराजय होतच असतो, मात्र मनाने न हारलेले ते व्यक्तीमत्व स्वतःचे कर्तृव, आत्मविश्वास, दूरदृष्टी जोपासत पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत,जनसामान्य नागरिकांचा आवाज बनण्यासाठी हातात “मशाल “घेत पुन्हा एकदा आपल्या आवाजाने,जीवनात जलद गतीने धाव घेत विकसित योजने चे आराखडे बनवत!

💥नुकत्याच झालेल्या लोकसभे निवडणुकीत पराभव च्या अधिक मताने निवडून येण्याचा मानस जोपासत स्वतःचा ध्येय मांडणारे चंद्रपूर जिल्ह्याची एक हाथी सत्ता घेत, नावारूपीस येणारे महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळात कद्दावर स्थानकात अप्रतिम कार्याची शैली मांडणारे अशे सुधीर मुंगटीवार अर्थात “भाऊ” ची वाटचाल आता राहलेले ऋण भरून काढण्याकडे वाटचाल करीत आहे.

👉विध्यार्थी पासूनच समाज -राजकारणाचा रस…
आमदार सुधीर मुनगंटीवार खरं तर विध्यार्थी दशे पासूनच राजकारणात सक्रीय झाले, अनेक आंदोलणे, शिष्टाइ चे उंबरठे पाहाता. पाहता.. त्यांना लोकसभे ची भाजप कडून तिकीट मिळाली,पहिलीच निवडणूक आणि आत्मविश्वास जोडत ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र त्यांना पराभवा शी सामना करावा लागला.आपण “हरलो नसून शिकलो” करीत ते पुन्हा जोमाने समाजकारण आणि राजकारणात मुक्त संचार करीत आपल्या विशिष्ट्य कार्यप्रणाली ने जनसमुदायात प्रसिद्ध झोतात आले. आणि त्यांची यशस्वी कार्यकीर्द त्यांना थेट पहिल्या विजयी “चंद्रपूर”विधानसभेमधून मुंबई मंत्रालय च्या दिशेने घेऊन गेली. त्यांची सुरवात दमदार आणि “जय विदर्भ “करीत नावालौकिस येऊ लागली, कार्यकर्ता असो की येणारा जनसामान्य नागरिक त्यांच्या समस्या च्या तक्रारी ला लगेच प्रतिउत्तर देणारे ते व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर मुंगटीवार! त्यांची बोली.. आणि विशेष प्रेमाच्या हाकेने अगदी समोरच्या् व्यक्तीला जणू आपलाच माणूस असल्याची साथ वाटायची, एक दोन.. करीत आतापर्यंत सुधीर भाऊ नी विधानसभेत जिल्ह्याच्या विकासा चा आतापर्यंत चा सर्वात मोठा आराखडा या नेत्याने जिल्ह्यात ओढून आणला!

कुणाला पचला आणि कुणाला अपचनी झाल,राजकारणात डाव पेच होतच असतात मात्र जे मुनगंटीवार करतील ते चांगल्या चांगल्यास आज पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील जमले नाही हे तितकेच विशेष!

सुरवातीच्या काळात अनेक लोकांच्या मुंबई वारी असायच्या, कोणी खासगी कामाने, कोणी वैदद्यकीय कामाने, कोणी शिक्षणाच्या कामाने, कोणी नौकरी च्या शोधात….
या वेळेस मुंबईतील त्यांच्या मजेस्टिक रूम नंबर 417ला नेहमी त्यांच्या निवास स्थानी लोकांची तुंबड गर्दी मिळायला बघत होती. कुणालाही” नाही नावाचा “त्यांचा हा शब्द कधीच त्यांच्या मुखाट्यातून ऐकायला मिळाला नाही.इतर जिल्ह्यातील आमदाराचे निवास स्थान लॉक दिसायचे मात्र ह्या नेत्याचे ते रूम ला कधीच कुलूप लागत नसे, अनेकांनी आपले त्या ठिकाणी राहून उदरनिर्वाह चे स्थान पण बनवत स्वतःचे मुंबई त घरे बनवले भाऊ नी अनेकांना जिवाभावाचे स्थान देत आयुष्य सुद्धा बनवून देण्यात महत्वपूर्ण आधार दिला, त्या यशस्वी गुरुकिल्ली ने अनेक जणांचे आयुष्य सुद्धा चमचमीत झाले.
महाराष्ट्रात एक वजनदार स्थान निर्माण करीत भाऊ नी विकास कामाचा,
आलेख च चंद्रपूर जिल्ह्यात उदयास आणला, त्यांच्या जिल्ह्यातील अनेक कल्पना अजूनही अर्धवट च राहल्या आहे त्यां पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. पराभवाचे खापर फोडणारा हा नेता नाही, तर स्वतःचे मनाने आत्मविश्वास लढवैय्या नेता म्हणून या नेत्यांची ओळख आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतांचा कडकडाट करण्याचा संकल्प त्यांनी हाथी घेत त्याची सुरवात त्यांनी केली आहे. त्यांची कारकीर्द उत्कृष्ठ वक्ता म्हणून नावालौकिस आहे, जिल्ह्यातील विरोधकांची कितीही फौज निर्माण झाली आणि आरोप झाले तरीही त्याला रफटफ उत्तर सुधीर मुंगटीवार तितक्याच त्यांच्या आवाजी शैली ने देतात.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!