Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsराजकीय गोळीबारी चा फुसका बार! गोळीबारी झालीच नाही - पोलीस तर काडतूस...

राजकीय गोळीबारी चा फुसका बार! गोळीबारी झालीच नाही – पोलीस तर काडतूस चा केस कसा पोहचला तो ही कितीतरी जुना.. कुणाचं षडयंत्र….

राजकीय गोळीबारीचा फुसका बार…. राजू रेड्डी गोळीबार प्रकरण….

चंद्रपूर/घुग्गुस -13 मार्च 2025

(सुशांत घाटे )

9 मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील काँग्रेस चे पदाधिकारी राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार झाल्याचे भाकीतवृत्त धडकताचा राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी चे आमदार किशोर जोरगेवार व विजय वड्डेटीवार यांनी विधानसभा अधिवेशना मध्ये गुन्हेगारी क्षेत्र आणि पोलिसांवर राजकीय पेच घेत गोळीबारी घटने चे सखोल कारवाई करण्याचे तसेच कुठल्या राजकीय सुडबुद्धी ने या घटनेत, सहभागी तर नाही न त्याचाही तपास करण्याची या वेळी मागणी केली.

⭐⭐राजकीय नेत्यावर गोळीबारीचा फुसका बार…!

घटनेच्या दिवशी पोलिसांचे पूर्ण कवच च घुग्गुस शहरात दाखल होत, घटना स्थळी पोहचले बॉम्ब स्काड ते ब्याल्लेस्टिक पथका सह पोलीस अधीक्षक स्वतः पूर्ण स्टाफ सहित प्रकरनाचा तपास करू लागले

..ज्या काडतूसाचा केस आढळला तो अत्यंत जुना असून त्या ठिकाणी कसा आला याचा तपास आता पोलीस करीत आहे.

जर फायरिंग झाली असती तर कुठे ना कुठे त्याचे निशाण आढळले असते! अशा विविध तपासाच्या यंत्रना घेत हा राजकीय षडयंत्र रचत गोळीबारी चा फुसका बार त नाही न असा प्रश्न निर्माण झाला आहे?

🌟गोळीबारी झालीच नाही…

चंद्रपूर पोलिसांनी गोळीबारी च्या घटनेला स्पष्ट नकार देत असा कुठला प्रकारच घडला नसल्याचं जाहीर केल आहे. आणि अफ़वा न पसरवण्याचे आव्हान ही केले आहे.

जर गोळीबार झाला नाही तर कुठल्या षडयंत्र ने हा डाव खेळल्या गेला त्याचा आता विरुद्ध तपास ही पोलीस यंत्रणा ठासून करीत आहे.

विधानसभा मध्ये राजकीय गोळीबारी चे पडसाद तर उमटले पण वास्तविकतेत राजकीय फुसका बार झाल्याने पोलीस ही आता गोळीबारी ला कोणी दिली गोली? याच तपासाने लक्ष केंद्रित करून बसले आहे.

⭐लवकरच गोळीबारी चे सत्य बाहेर येईल?

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे स्वतः या गोळीबारी च्या फुसक्या बाराने अवाक झाले आहे. घटनेच्या दिवशी पासून त्यांना अनेक त्रुटी आढळून आले असताना त्यांना काही तरी या घटनेत गोम असल्याचे संशय बळावले आहे.

 हा राजकीय गेम कोण्यता कारणास्तव खेळला गेला त्याचा आता कसून तपास घुग्गुस चे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे हे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात करत आहे. राजकीय क्षेत्रातल्या अनेक पधादिकारी यांना चौकशी साठी आता पाचारण करण्यात येणार आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!