चंद्रपूर 23 मार्च 2025
सुशांत घाटे
“कसे साचले शेवाळ
इथल्या निर्मळ पाण्यावरी
प्रत्येकाचाच डोळा आहे
छनछणाऱ्या नाण्यावरी “⭕माणसाच्या हृदयात धूमसणाऱ्या स्वार्थाच्या इवल्याश्या ज्योतीने पेट घेतला की त्यातून जन्माला येतो भ्रष्टाचारासारखा भयानक वणवा
आणि त्या वणव्याची आग म्हणजे न विझणारी!
मागील तीन विशेष बातमी पत्रात डेली पोस्टमार्टम नी राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांचा वसुलीनामा प्रकाशित केला, सामान्य नागरिकांची लूटमार, हफ्तेखोरी आणि वसुलीचे बिंग याचा पर्दापाश आम्ही केला आहे !
आमचे वृत्त अत्यंत विश्वसनीय आणि गोपनीय माहिती च्या आधारे प्रकाशित केले आहे. लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून आम्ही पूर्ण जवाबदारी ने, भ्रष्टाचाराचे वाहतूक विभागातील रथी महारथी यांची कार्यशैली मांडली आहे?
- 👉कोणत्याही आमीषाला डेली पोस्टमार्टम बळी पडणार नाही आणि भ्रष्टाचारा वर जोपर्यंत कारवाई होणार नाही तो पर्यंत मागे सुद्धा हटणार नाही हे पांढऱ्या दगडा वरची काळी रेष त्या भ्रष्टखोर आणि लाचखोरांनी लक्षात ठेव्हावी!
राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांची व्युहरचना त्यांच्या विशिष्ट कार्यपद्धतीने रेटिंग वाढवीत आहे.
चंद्रपूर जिल्हा महामार्ग पोलिसात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एकपोलीस उप निरीक्षक आणि 35 कर्मचाऱ्यांचा ( अंदाजीत ) स्टाफ सध्या कार्यान्वित आहे.
याच वाहतूक कर्मचाऱ्यातून जवळपास 12 निवडीक लोकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर यांनी अवैध वसुलीचा पंचाग दिला आहे?
सूर्योदय झाला की जिल्ह्यातील पूर्व – पश्चिम – उत्तर – दक्षिण हफ्तेवारी करीत एक दिवस ही न चुकवता जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात ई – चालान च्या नावाखाली सामान्य जनतेच्या खिशाला कात्रण लावण्याचा मोठा डाव हे शासनाच्या तिजोरीला बगल देत खेळत आहे?
राजरोसपने यांची वाढलेली भ्रष्टाचाराची हिम्मत म्हणजेच याच विभागातील काही भ्रष्टखोर अधिकाऱ्यांचा आशीर्वाद!
⭐गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा महामार्ग वाहतूक पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकार यांनी करोडो रुपयाची अवैध वसुली चंद्रपूर जिल्हा महामार्ग वाहतूक विभागाच्या भंडारातून केली आहे?
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातून जिल्हा महामार्ग वाहतूक पोलिसात दाखल झालेल्या मनोज पिदुरकर यांची अवैध हफ्ता वसुली साठी गेल्या गेल्या लॉटरी च लागली! कारण ही तसेच होते कारण या आधी त्याचा विश्वासू बॅचमेट याच ठिकाणी वसुली ला नियुक्त होता?
जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट धारकांकडे मनोज नी आल्या आल्या फुल्ल रेटिंग वाढवल्याने अनेक ट्रान्सपोर्ट धारकांच्या भुवया उंचवल्या आणि त्यांनी नाराजीचा सुर गवसला!
ज्यांचे महिन्यांचे हफ्ते 5000₹ होते त्यांना 10000 ₹आणि ज्यांचे 10000₹ होते अशांचे 20000 ₹ करत मनोज नी उधम माजवाला, अधिकाऱ्याच्या तोऱ्यापेक्षा जसा हाच वसुलीबाज चा हायवे हिरो ठरला!दर महिन्याला सात- आठ लाख रुपयाचे कलेक्शन करणाऱ्या मनोज चा जरा रुबाब च वेगळा आहे! स्वतःला अधिकाऱ्यापेक्षा कमी न समजणाऱ्या अनेक रोचक कथा याच विभागातील प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डेली पोस्टमार्टम ला सांगितले.
जर साफ नियतीने प्रामाणिक काम केले तर घाबरण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, मात्र नियतीत खोटं राहली की पाऊले आपोआप च मागे सरकायाला लागतात.
जिल्हा महामार्ग वाहतूक विभागातील निवडीक कर्मचारी, वसुलीबाज आणि अधिकाऱ्यांना लागलेली भ्रष्टाचाराची कीड म्हणजे सामान्य जनतेची लूट च म्हणावी लागेल!
लोकसेवक म्हणजे निःस्वार्थ भूमिकेतून कार्य करणारा अधिकारी -कर्मचारी असावा मात्र भ्रस्टाचाराचे ग्रहण लागलेल्या या लोकसेवकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आवाज तर उठवावाच लागेल.
ADG ट्रॅफिक कडे तक्रार……
जिल्ह्यातील हफ्तेवसुली करणाऱ्या जिल्हा महामार्ग पोलिसांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते दीपक जैस्वाल यांनी राज्य महामार्ग चे ADG डॉ. छेरिंग दोरजे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ट्रान्सपोर्ट धारकांची होणारी लूट मुळे कित्येक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक त्रस्त झाल्याचे ही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.


