Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsतोतया पत्रकारांचा पोलिसांनी खेळ केला खल्लास.. पॅन्टच झाले ओले

तोतया पत्रकारांचा पोलिसांनी खेळ केला खल्लास.. पॅन्टच झाले ओले

चंद्रपुरात “भुरट्या पत्रकारांचा” कांड उघड!
असह्य विधवा महिलेकडून खंडणी उकळणाऱ्या सहा तोतया पत्रकारांचा रामनगर पोलिसांकडून पर्दाफाश

चंद्रपूर :6 नोव्हेंबर

पत्रकारितेच्या नावावर जिल्ह्यातील काही भुरट्यांनी केलेला काळा कारभार अखेर उघडकीस आला आहे. चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाणे हद्दीत असह्य विधवा  महिलेकडून खंडणी उकळणाऱ्या सहा बोगस पत्रकारांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
ही घटना संपूर्ण जिल्ह्यातील प्रामाणिक पत्रकारांसाठीही लाजिरवाणी ठरली आहे.
चंद्रपूर शहरातील एका दवाखान्या शेजारी एक महिला अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती कुणाल नावाच्या एका तोतया पत्रकाराला मिळाली.
या माहितीचा वापर त्याने खंडणी उकळणीसाठी करण्याचा डाव आखला.
त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना — त्यात बल्लारशाहमधील एक महिला आणि चंद्रपूरमधील चार जण या मध्ये सामील केले होते.
— त्यानंतर या बोगस पत्रकारांच्या टोळीने अवैध व्यवसाय होत असलेल्या ठिकाणी धाड टाकत असह्य विधवा महिलेवर दबाव आणून एक लाख रुपयांची खंडणी मागितली.महिलेने भीतीपोटी आपली गळ्यातील सोन्याची चेन विकून ९१ हजार रुपये दिले मात्र, या घटनेची चर्चा काही तासांतच शहरात वणव्यासारखी पसरली.
त्यानंतर या घटनेची चर्चा पोलिसांच्या कानावर येताच रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला. त्या असह्य विधवा महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता संपूर्ण खंडणीचा कट उघड झाला.पोलिसांनी या सहा ही तोतया वर गुन्हा दाखल करत त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चार भुरट्या पत्रकारांना ताब्यात घेतले.गुन्हा दाखल असलेल्या आरोपी मध्ये राजू निगम, राजू शंभरकर, योगिता पाटेकर, कुणाल, अविनाश आणि सचिन याची नावे आली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान काही आरोपींनी पोलीस ठाण्यातच पॅन्ट ओला केला पोलिसांनी या बोगस पत्रकारांचा “पत्रकारितेचा नशा” उतरवला यात पोलिसांनी पुढची कारवाई सुरू केली असून जिल्ह्यातील बोगस पत्रकारांमध्ये खळबळ उडाली आहे. आता या कारवाईनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक “पत्रकार” असल्याचा लेबल लावून फिरणारे भुरटे आणि बोगस आता सावध झाले आहेत.
दिवाळीच्या प्रकाशात अचानक बाहेर आलेले हे “पावसाळी मेंढक” पुन्हा आपल्या बिळात शिरले असल्याची चपखल चर्चा शहरात रंगली आहे.पोलिसांनी केलेल्या या कारवाईने पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या भुरट्या पत्रकारांचा खंडणी उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!