Thursday, August 27, 2026
HomeBreaking Newsराज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुष्काळात तेरावा महीना, दोन कोटीची मार्च मध्ये हफ्ता...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुष्काळात तेरावा महीना, दोन कोटीची मार्च मध्ये हफ्ता वसुली?

चंद्रपूर – (8 एप्रिल 2025)
*सुशांत घाटे*

चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियतीला, भ्रष्टाचार च्या सावट्याने ग्रासित केले आहे.
मागील वर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लाचखोर अधीक्षक ला ACB ने बेड्या ही ठोकल्या होत्या मात्र या विभागाचा अद्यापही भ्रष्टाचार काही कमी झाला नाही.

दारूबंदी हटल्या नंतर नियमांना तिरंजली देऊन मद्द्यपरवाने वाटपाचा गोंधळच उडवून दिला, करोडो रुपयाची अधिकाऱ्यांनी लाच घेत, चक्क नियमात न बसणाऱ्या ही बार ला परवाने  देण्याचे कितीतरी प्रकरणे चव्हाट्यावर आले आहे.

राज्य शासनाने SIT गठीत करीत याची उच्चस्तरीय चौकशी सुद्धा लावली त्याची जवाबदारी SIT चे प्रमुख ACB चे  महानिरीक्षक संदीप दिवाण यांना देण्यात आली आहे.

7 आणि 8 एप्रिल रोजी याची झाडाझडती घेण्याकरीता SIT च पथक चंद्रपुरात तळ ठोकून आहे. काल जवळपास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 20 तक्रारी SIT ला प्राप्त झाल्या आहे.

🌟दुष्काळात नूतनी करणासाठी तेरावा महीना?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना लाचे पोटी दरमहा महीना व्यतिरिक्त नूतनिकरणासाठी मार्च च्या महिन्यात एका महिन्याचे अतिरिक्त हफ्ता जिल्ह्यातील परवाना धारकांकडून वसुल केला आहे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व परवाना धारकांकडून जवळपास जिल्ह्यातून दोन कोटीचे रुपयाचे भ्रष्टखोर अधिकाऱ्यांनी वसुली केल्याचे उघडकीस आले आहे!
बियर शापी, परमिट बार, देशी दारूचे दुकानें, तसेच वाईन शॉप कडून हे कलेक्शन करण्यात आल्याची माहिती आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!