Saturday, June 13, 2026
HomeBreaking Newsविशेष वृत्त 🍁"अण्णा"..... मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते आयपीएस मुमक्का सुदर्शन...

विशेष वृत्त 🍁”अण्णा”….. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते आयपीएस मुमक्का सुदर्शन…

चंद्रपूर-(26 ऑक्टोबर 2025)
सुशांत घाटे
…………………. 💢………………
💢” आयुष्याच्या उंबरठ्यावर कितीतरी आव्हाने येतात..आणि जातात” मात्र प्रतिकुल परिस्थिती मध्ये सामना करत अभ्यासजोगा, व्यक्तिमत्व जो त्याला सारतो त्याला व्यक्तिमत्वाचा “आदर्श” असा दर्जा ही प्राप्त होतॊ.

आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर या ऐतिहासिक शहरातून आपल्या जीवनाची संघर्षमय सुरवात करणाऱ्या या व्यक्ती महत्वाची आज खास ओळख महाराष्ट्र राज्यातील सुपर प्रशासनिक IPS कॅडर मध्ये पोलीस विभागात रुजू झाली आहे ते म्हणजे “मुम्मका सुदर्शन” यांची.

🍁मध्यमवर्गीय असणारे IPS मुम्मका यांचे वडील अनंतपूर दूरसंचार विभागातील कर्मचारी अत्यंत साधे, सरळ व्यक्तीमत्व असणाऱ्या या कटुंबातील IPS मुम्मका यांनी आपली लक्ष केंद्रित करत मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी प्राप्त केली.

💢साध्या सरळ स्वभावाचे मुम्मका सुदर्शन मात्र यांचे मन काही या पदवी घेऊनही समाधानी नसताना त्यांनी UPSC कडे आपला कल केला.

🌟जिद्द आणि चिकाटी चा आत्मविश्वास आणि जपून त्यांनी UPSC ला क्रॅक करत अनंतपूर शहराच्या नावात आणखी एक उमदा IPS म्हणून भर टाकली.

एका छोट्याश्या मध्यमवर्गीय कुटुंबातून त्यांनी ही भरारी घेतल्याने त्यांचे यश त्याच्या स्वाभाविक चेहऱ्यांची ओळख झाली.
IPS होताच त्यांना महाराष्ट्र कॅडर मध्ये घेण्यात आले.

🌻महाराष्ट्र राज्यात पोलीस विभागात त्यांची प्रशिक्षण नंतर गडचिरोली जिल्ह्यातील “आरमोरी”डिव्हिजन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सुरवात झाली.

🍁नक्सलग्रस्त जिल्हा आणि मुम्मका सुदर्शन यांचा दूरवर काहीही संबंध नसताना त्यांनी आपल्या भावनिक आणि सामाजिक बांधिलकीची या भागात एक उत्तम अधिकारी म्हणून सेवा बजवली. अनेक नक्सल च्या चकमंकी आणि गडचिरोली जिल्ह्यातील C-60 च्या, नक्सल विरोधी अभियानावर सुद्धा मुम्मका सुदर्शन यांनी जिगरबाज काम केले.

🍁बोलण्यापेक्षा कृतीतुन काम करणाऱ्या या IPS कॅडर च्या अधिकाऱ्याला एक नवीन दिशा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून मिळाली.
जिद्द, चिकाटी, उमंग असा त्रिशूलीय बाणा घेऊन त्यांनी आपली खास शैली निर्माण करत महाराष्ट्र पोलीस विभागात नाव नोदवले.

💮त्यांच्या सुपर कनेक्टिव्हिटी आणि बेधडक कार्यशैलीने त्यांना नागपूर DCP क्राईम ची ही जवाबदारी मिळाली. नागपूर सारख्या ठिकाणी अनेक राजकीय वशिले बाजी करणाऱ्या या ऑरेंज सिटी ला IPS च्या रूपात क्राईम DCP ची सुदर्शन यांना पोस्टिंग मिळाली.

💢अनेक गुन्ह्याचा स्ट्रेट फॉरवर्ड तपास करणाऱ्या या अधिकाऱ्याने सोंटू जैन सारखा मोठा तपास हाताळत दुबई सारख्या ठिकाणाहून आरोपीना जे्रबंद केले. त्यांची प्रशासनिक गतिमानता आणि चाणक्य निती ही नागपूर मध्ये चर्चेत आली.
त्यानंतर त्यांना थेट त्यांच्या कार्याची गृह विभागाने दखल घेत त्यांना चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदी निवड केली.

सुरवातीच्या काळात मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातली परिस्थिती चा आढावा घेतला, निष्क्रिय असलेल्या पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी फटकार ही लावली.जिल्ह्यातील वाढलेली गुन्हेगारी आणि अनेक अवैध धंद्यावर त्यांनी धाडसत्र मोहीम राबवत स्ट्रिक्ट ऍक्शन घेत पोलीस विभागाला बलवान ही केले.IPS
मुम्मका सुदर्शन यांची जीवनशैली अत्यंत शांत स्वभावाची असून कायद्यापुढे ते कोणालाही मोठं समजत नाही हे त्यांच्या नेहमीच कृतीतून झळकत असते.

🍁🍁त्यांची हीच झळाळी नेहमीच महाराष्ट्र पोलीस विभागात मानाचा तुरा करून राहो, ही आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने डेली पोस्टमार्टम कडून विशेष भेट…
जय हिंद……

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!