नागपूर /चंद्रपूर
5 मे 2025
(सुशांत घाटे )
💢चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागलेली भ्रष्टाचाराची खाज डेली पोस्टमार्टम बातम्याच्या माध्यमातून इच गार्ड लावून नक्की संपवेल!
भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला उत्पादन शुल्क विभागातील पोलखोल ही डेली पोस्टमार्टम ने करताच त्याची दखल घेण्यात आली आहे.
जिल्यातील भ्रष्टाचाराचा राज्य उत्पादन शुल्क विभागातील धूर मुंबई तील मंत्रालयाच्या दालनात पोहचला गेल्या आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकार यांनी डेली पोस्ट मार्टम वृताची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना या भ्रष्ट अधिकाऱ्यांची लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. आणि सखोल चौकशी करून यांच्यावर कारवाई ची मागणी केली आहे.
नितीन भटारकर हे सामाजिक चळवळीतले तरुण नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात त्यांनी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवत त्यांनी आपली ओळख चंद्रपूर जिल्ह्यात क्लीन मॅन म्हणून निर्माण केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची भ्रष्टाचाराची त्यांना माहिती मिळताच अधिकाऱ्यांच्या नावाच्या यादीसहित त्यांनी थेट लेखी तक्रार केल्याने खळबळ माजली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरोरा सर्कल चे विकास थोरात त्यांचा हवालदार जगदीश म्हस्के तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील भरारी पथकाचे ईश्वर वाघ तर चंद्रपूर चे दुय्यम निरीक्षक अभिजित लिचडे यांच्या सहित वसुली ला लागलेल्या सर्व खासगी व्यक्तींच्या गोपनीयता भटारकार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली आहे
💢नितीन धार्मिक ना फोन घेण्यास ऍलर्जी आहे का?
🔅राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भ्रष्टाचार बाहेर येत असताना, जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक त्याबाबत बोलण्यास टाळाटाळ करण्याचे दिसून आले आहे?
💢जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी हे स्वतः ग्राउंड लेवल ला उतरून काम केल्याचे जिल्ह्यातील नागरिकांनी बघितले. सामान्य जनतेच्या समस्या सोडवान्यापासून पासून तर तक्रार निपटारा करण्या पर्यंत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि जिल्हाधिकारी विनय गौडा हे नेहमी अग्रेसर राहले.
🛞मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक चंद्रपूर जिल्ह्यात आल्या पासून फक्त ऑफिस च्या कार्यालयात AC ची हवा खात बसले आहे?
जिल्हायात बनावट दारू चे मोठे कंटेनर पोलीस विभाग पकडत आहे. मात्र अधीक्षक महाशय फक्त कारवाई करा म्हणून सूचना च आपल्या विभागाला प्रसारित करत आहे.
कामा मध्ये शून्य झालेल्या चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाला फक्त भ्रष्टाचाराची कीड लागली आहे.
अधीक्षक धार्मिक यांना पत्रकारांचा फोन घेण्यास बरीच ऍलर्जी दिसत आहे?
त्यांच्या ऍलर्जी चे कारण डेली पोस्टमार्टम नक्की शोधून काढेल.
……………………………………..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

