चंद्रपूर -24 ऑक्टोबर 2025
(सुशांत घाटे )💢💢💢💢💢💢💢
👉गुन्हेगारी क्षेत्रात आपले स्थान प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी चक्क आता अल्पवयीन युवकांना काही गुन्हेगारी टोळीने घेरले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
जिल्ह्यात पोलीस विभागानी कितीही या गुन्हेगारी वर अंकुश लावण्याचा प्रयत्न जरी चालवला मात्र या युवकांनी “तंमच्चे पर डिस्को” करत अल्पवयीन मुलांना आपल्या बेड्या मध्ये समाविष्ट करत नवीन फार्मुला गुन्हेगारी क्षेत्रात आखला आहे.
बल्लारपूर येथून नुकतीच 22 बंदूकीची खेप राजुरा आणि स्वास्ती या ठिकाणी पोहचली असून त्याचा अभ्यास सुद्धा जंगलातील भागात शूटआऊट करत बंदूकीच्या भरमारातून दिला असल्याचे विश्वसनीय माहिती येत आहे.
कोळसा खाण आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी प्रकार राजुरा शहरा सारख्या बेल्ट मध्ये आता समोर उघडकीस येऊ लागला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथून येणारा हा भरमसाठा अमरावती, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या ठिकाणाहून येत असल्याची मोठी माहिती गोपनीय सूत्रांनी डेली पोस्टमार्टमला दिली आहे.
लहान मोठे शस्त्र नाही तर चक्क बंदुकीच्या धाकावर आता जिल्ह्यातील राजुरा शहराला केंद्रबिंदू करून गुन्हेगारी टोळीने बंदूक उगारण्याचे साधन देत प्रशिक्षण देण्याचे हालचाली देण्याचे काम ही सुरु केले आहे.
तरुण गुन्हेगारी युवकांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांना त्यांचे टार्गेट देण्यात आल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
एकट्या राजुरा आणि स्वास्ती मध्ये जर 22 माउजर आणि देशी कट्टा या सारख्या बंदूक चें टास्क पोहचले असेल तर जिल्ह्यातील आणखी किती ठिकाणी या प्रकारचा गुन्हेगारी प्रादुर्ब पोहचला असेल याचा आढावा घेण्याची पोलीस विभागाला गरज आहे.
नुकत्याच काही दिवसा अगोदर चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासना च्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी कारवाई करत शस्त्रसाठा ही जप्त केला आहे.
गुन्हेगारी चा अंत झाला नसून पुन्हा दिवसागनिक अधिक गतिमान पद्धतीने वाढत चालले आहे. काही कामचोर पद्धतीची पुलिस कुमक असल्याने फक्त आर्थिक हितासाठी काही ठिकाणी तळ ठोकून गुन्हेगारी यंत्रनेला ही पोलीस विभागातील बॅक सपोर्ट काम करत असल्याचीही गोपनीय माहिती हाती आली आहे.
💢टार्गेट वर राजकीय नेते?💢
काही गुन्हेगारी टोळीने राजकीय आश्रय घेत आपल्या संरक्षण साठी नेत्याला स्वतःच्या टास्क मध्ये घेत रेती, कोळसा या सारख्या युनिट मध्ये समाविष्ट केले आहे. काहीही झाले तर नेत्याला कॉल लावून गुंडगिरी नंतर दादागिरी करण्याचा डाव चंद्रपूर जिल्ह्यात रुजू केला आहे.
प्रत्यक्षात हा डावपेच नसून येणाऱ्या काळात गुंडगिरी आणि राजकीय व्यासपीठावर थरारक खुनी डाव होण्याचे चिन्ह आता नवयुवक अल्पवयीन मुलांच्या हाती आलेल्या बंदूकीच्या ट्रिगार वरून दिसत आहे?
…………………… भाग -1……….
..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

कोळसा खाण आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी प्रकार राजुरा शहरा सारख्या बेल्ट मध्ये आता समोर उघडकीस येऊ लागला आहे.