चंद्रपूर- 26 सप्टेंबर 2025
(सुशांत घाटे)
चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन यंत्रनेतील अत्यंत निचतेची पातळी गाठणारा वादग्रस्त विवादित ठाणेदार म्हणून दुर्गापूर चा संदीप एकाडे यांचे बरेच कारनामे आता चर्चीत येऊ लागले आहे.
काटा काढतो एका एकाचा… तुमच्या आई चा.. भर गिनतीत ठाणेदार म्हणतो…
दुर्गापूर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी या ठाणेदारचा पाढा वाचताच संतापलेल्या ठाणेदाराने बेभान वक्तव्याची टोकाची सुईचं हाती घेतली आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांना चौकशी करून ठाणेदार संदीप एकाडे यांचा अहवाल देण्यास सांगितलं होते.
दरम्यान सुधाकर यादव यांनी कर्मचाऱ्यांचे स्वतः पोलीस स्टेशन ला जाऊन बयान नोंदविले आणि त्याचा अहवाल पोलीस अधीक्षक यांना एक हफ्त्या आधी दिला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन गुप्त अहवाल बघितला…
मात्र अहवाल बनत असताना पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे कार्यालय गाठुन कुठ कुठल्या कर्मचाऱ्याने आपल्या विरुद्ध बयान नोंदविले त्याचे या महाशयाने गुप्त अहवालचे वाचन केल्याचे धक्कादायक खात्रीलायक वृत्त आहे. याला सहकार्य करणाऱ्या उपविभागीय पोलीस कार्यालयातील तो कर्मचारी कौन?
SP ला सेट केलं असल्याचा एकाडे चा दावा?
पोलिस अधीक्षक यांच्या दालनात जाऊन आता अमृत घेऊन आपण अमर झाल्याचा सोंगाडा करत ह्या ठाणेदाराने चक्क दुर्गापूर पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत धमकी चा मोठा इशारा दिला आहे.
संपन्त नावाच्या कर्मचाऱ्याचा आपण काटा काढला आता वणी कॅम्प, भिसी, जिवती साठी तैयार राहा, ज्यांनी ज्यांनी माझ्या विरोधात बयान दिले त्यांचे कसे बारा वाजवतो असे पोलीस कर्मचाऱ्यांच्या गिनती मध्ये आगपाखोड करत अश्लील भाष्य केल्याचा संताप जनक प्रकार घडला आहे?
न्याय मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होत असलेला संदीप एकाडे यांचा प्रहार ने सध्या ठाण्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.
पोलीस अधीक्षक यांनी खरेतर तात्काळ कारवाई करून कर्मचाऱ्यांना न्याय दयायला हवा होता,पण ठाणेदाराचा वाढलेला आवाज,आज आई बहिणीच्या शिवीच्या अश्लील तेच्या पुढेही चालला असल्याचे बोलल्या जात आहे.
आधी हा ठाणेदार चेंबर ला बोलायचा आता तर थेट गिनतीत बोलतो की SP काही नाही कारणार, मी सेट केले आता तुम्हाला करतो, एक काटा आता काढला आणि उर्वरित पूर्ण काटे काढतो तैयार राहा तुमच्या आई…. चा जे विरोधात गेले आणि त्या पत्रकारांना पाहतो,असे करत धमकी वजा इशारा या ठाणेदाराने दिला असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.आणि तीन दिवसाच्या सुट्टी टाकून रजेवर गेल्याची विश्वसनीय माहिती आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

