चंद्रपूर (7मे) – रात्री च्या सुमारास बेभान होत हॉटेल व्यावसायिक सध्या चंद्र तारे तोडत असल्याच्या प्रकार समोर येऊ लागला आहे.
इतर हॉटेल व्यावसायिक रात्री साढे अकरा वाजता नंतर बंद होत असताना मात्र जटपुरा परिसरात चंद्रोदय हॉटेल ची मेजवानी पहाटे पर्यंत सुरु असल्याने पोलीस प्रशासन वर ताशेरे ओढल्या जातं आहे?
रामनगर पोलीस स्टेशन हद्धीत येणाऱ्या चंद्रोदय हॉटेल चे पहाटे चालण्याचे गुपित काय हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे? या हॉटेल मध्ये मध्य रात्री च्या सुमारास मोठी रेलचेल पाहायला मिळत असून पहाटे चार वाजे पर्यंत या चंद्रोदय हॉटेल ला पोलीस विभागा तर्फे काई खास मुभा देण्यात आली का हा मोठा प्रश्न इतर हॉटेल व्यावसायिक कांना पडला आहे?
मध्य रात्री सुरु असलेल्या ऐन रोड वर च्या या हॉटेल व्यवसायिका चे बिन दिक्कतपने जेवणाच्या टेबलावर दारू चे खंबे सुद्धा रिचवले जातं असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे बोलल्या जातं आहे?
रात्र भरात या ठिकाणाहून पोलिसांनाचे कितीतरी वाहन गस्त घालत असताना त्यांच्या डोळ्या देखत चालणाऱ्या या हॉटेल व्यवसायिकाला अभय का हा मोठा प्रश्न जनसामान्य नागरिकांत पडला आहे?
इतर हॉटेल व्यवसायिकांच्या रात्री च्या कालावधीत मुसक्या आवाळणाऱ्या पोलीस प्रशासनाचा मेहेरबानीचा फॉर्मुला काय आहे हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे?
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

