Tuesday, November 24, 2026
HomeBreaking NewsDYSP सुशील कुमार नायक चा तेज तर्रार, "गो" तस्करांना अनकट देत दाखवला...

DYSP सुशील कुमार नायक चा तेज तर्रार, “गो” तस्करांना अनकट देत दाखवला शो…..

चंद्रपूर /वर्धा -22 सप्टेंबर 2025
सुशांत घाटे
………..
नागपूर जिल्ह्यातील कामठी मधून गो तस्कर चा सुरु होत असलेला खेळ चंद्रपूर पोलिसांनी एका पाठोमाग कारवाईचा बडगा उभारून हाणून पाडला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन ला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कडक सूचना देत गो तस्करी ला आळा घालण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र गो तस्करांनी पोलिसांच्या होत असलेल्या कारवाया बघून नवीन मार्ग तयार केला आहे.

वर्धा जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशन च्या मुकसमंतीने गो तस्कराचा खेळ चालायचा तो म्हणजे नागपूर -समुद्रपूर – हिंगणघाट-अल्लीपूर -वडनेर, राळेगाव -पांढरकवडा मार्गे थेट हैदराबाद ला जाण्याचा!
विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील नव्याने हिंगणघाट डिव्हिजन चे उपविभागीय पोलीस अधिकारी असलेले सुशील कुमार नायक यांनी या गो तस्करीला कारवाईचा चा बडगा उभारत चांगलाच चोप बंदोबस्त दिल्याने वर्धा जिल्हा हादरला आहे.

गो तस्करीची माहिती मिळताच स्वतः एकटे ते खाजगी गाडीने ड्रायवर ला घेत निघाले, जवळपास 10 गाडीचा गो तस्करी चा ताफा जात असतांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गो तस्करांनी गाडी ला कट मारत ओव्हर टेक केला त्यांचा पिच्छा करीत रुद्र अवतार धारण केलेल्या नायक यांनी 4 गाडयांना पकडत कारवाई केली.
नायक यांच्या चोप बंदोबस्तांनी गो तस्करांचे इतके धाबे दनालले की त्यांना सेवाग्राम हॉस्पिटल ला ऍडमिट होण्याची वेळ आली.
कडक शिस्तीचा आणि गुन्हेगारीचा कर्दनकाळ असलेल्या नायक यांनी त्यांच्या क्षेत्रातील ड्रुग्स, गांजा, बनावट दारू,सोबत गुन्हेगारी ला ठेचून काढण्याचा सफाटा सुरु केला आहे. त्यासाठी स्पेशल लठ्चा साठा त्यांनी ठेवला असल्याचे गुन्हेगारी जगतात बोलल्या जात आहे.
पोलीस खात्यात सुरवाती पासून त्यांची डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून  प्रतिमा आहे.

चंद्रपूर, वणी, गडचांदूर, नांदेड जिल्हा करीत आता त्यांची हिंगणघाट या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या या कारवाई च्या दणक्याने धक्का पोहचला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांचा बिमोड करणाऱ्या नायक यांचा चांगलाच दबदबा सध्या वर्धा जिल्ह्यात गाजू लागला आहे. गुन्हेगारीचा कर्दनकाळ असणाऱ्या नायक यांची ठोस भूमिका सध्या सामान्य जनतेच्या मुखातून कौतुकाचा वर्षाव घेऊन पडू लागली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!