Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsत्या वादग्रस्त ठाणेदाराचा वसुली साठी कांगावा.... योगा योगा ने शार्दूल नी फुगवला...

त्या वादग्रस्त ठाणेदाराचा वसुली साठी कांगावा…. योगा योगा ने शार्दूल नी फुगवला वसुली फुगा ?

चंद्रपूर -15 ऑक्टोबर 2025
(सुशांत घाटे)

👉चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील सर्वात मोठा वादग्रस्त असणाऱ्या त्या “ठाणेदारा”वर अखेर लवकरच कारवाई होणार असल्याचे वरिष्ठ पातळीवरून संकेत मिळाले आहे.

कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक आणि अश्लील तेचा शब्दातून ठेचा करणाऱ्या त्या एकडू ठाणेदारा च्या,  बऱ्याच कारनाम्याने चंद्रपूर जिल्हा आतापर्यंत, पोलीस विभागातून ढवळून निघाला आहे.या ठाणेदाराने वसुली साठी कांगावा करत  अवैध वसुली साठी खेळ केला आहे.महिन्याकाठी येणारी अवैध माया आधी संपत च्या जीवावर बेतली असताना आता योगा योगा ने शार्दूल च्या हातात येऊन राजू मार्फत त्या ठाणेदारच्या जिव्हाळ्यात 5 लाख 20 हजाराची किल्लारी करू लागली आहे.

चंद्रपूर, नागपूर, अमरावती तिन्ही ही ACB च्या युनिट मध्ये शार्दूल चा वसुली चा डावपेच पोहचला असून बारकाईने त्याचा तपास सुरु झाल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.

आधी घुघूस येथे विवादित पडलेल्या त्या कर्मचाऱ्याला वसुलीची दक्षिणा साठी सत्य नारायणाची पुजा करा लागली आहे. त्यानंतर अवैध दारू, सट्टा, क्रिकेट बुकी, मातीवाली कंपनी, ठेकेदार तसेच ट्रान्सपोर्ट, कोळसा, भंगार या मधून आता लाखोची माया या दहा ऑक्टोबर पर्यंतच शार्दूल बुवा नी उभारली असल्याची गोपनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. दुर्गापूर च्या कानाकोपऱ्यात सध्या शार्दूल नी आपले तंबू गाढले असून त्या “ठाणेदारची” एक हाती सत्ता उभारत वसुली अभियानाला दिवाळी केली आहे.पण याचं विभागातील एका कर्मचाऱ्याने ACB शी संपर्क साधतं याचा विस्तृत डाटा च ACB च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई या ठिकाणी पाठविला असल्याची माहिती येत आहे.

त्या ठाणेदारची अवैध वसुली आणि शार्दूल ची वसुली साठी धावपळ यांची दोघांचीही लवकरच या पोलीस विभागातील जोडी हिरालाल, पन्नाललाल म्हणून चर्चेत आली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!