वर्धा -18 ऑगस्ट 2025
(सुशांत घाटे)
15 वर्षांपासून अत्यंत निष्ट्येने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या,आकस्मिक मृत्यूला जवाबदार असणाऱ्या लोकांवर अद्याप कारवाई करण्यास वर्धा शहर पोलिसांना मुहूर्त नाही मिळाला का? याचा प्रत्यय सध्या समाजात “त्या”वायरल होत असलेल्या सुसाईड नोट च्या माध्यमातून फिरू लागला आहे.वीरेंद्र जयस्वाल(60 वर्ष) असे त्या गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, मूळचा छत्तीसगड राज्यातील राजनंदगाव जिल्ह्यातील रहिवासी मात्र कामाच्या शोधात पूर्ण कुटुंबीय सोडून गेल्या 15 वर्षा पासून आर्वी चौक येथील “वंजारी” च्या आयुष पेट्रोल पंप वर सातत्याने नौकरी करत इमानदारी ने काम केले.
पण गेल्या काही महिन्याच्या अंतरात पेट्रोल पंपावरच काम करणाऱ्या तीन जणांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने टॉर्चर करून त्यांची मानसिक बुद्धी आणि त्या मृतकाच्या भाड्याने राहत असलेल्या घरी जाऊन त्याच्या सोबत चुकीचा व्यवहार केला असल्याचा स्पष्ट संदेश त्या मृतक वीरेंद्र जयस्वाल ने आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहिला आहे.
💢आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या लोकांची नावे?
योगेश भानकर, ब्रिजेश व्यास, पंकज शर्मा आणि त्यांचा मित्र गोलू याने मृतकास भयंकर टॉर्चर केले असल्याचा खुलासा आत्महत्या करण्यापूर्वी वीरेंद्र आपल्या हाता ने डायरीच्या पानावर लिहिलेला आहे.
3 जून रोजी सिलिंग पंख्याला दोर बांधून गळफास घेत वीरेंद्र जयस्वाल यांनी आपली जीवनयात्रा संपवली !
मात्र त्याच्या मृत्यूस जवाबदार असणाऱ्या ना तत्कालिन पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी कारवाई मध्ये निष्काळजी पणा दाखवला ही गोष्ट पेट्रोल पंप च्या मालकी असलेल्या त्या महिलेला सुद्धा माहिती असल्याची धक्कादायक बाब त्या सुसाईड नोट मध्ये असताना ही पोलिसांनी या प्रकरणाला वेगळेच वळण दिले असल्याची चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे.
🛞सामाजिक कार्यकर्त्यां काजल गवई यांचा इशारा….
🍁आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या
“त्या ” दोषींवर तात्काळ कारवाई करा,अन्यथा कायद्याला ठेंगा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यां विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याची भूमिका काजल गवई यांनी मांडली आहे.याबाबतीत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची सुद्धा भेट घेण्यात आली. तरिमात्र त्यांची दखल तत्कालीन पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी घेतली नाही. याचाच अर्थ पोलीस अधीक्षकांना न ऐकणाऱ्या आणि गांभीर्य न ओळखणाऱ्या या
प्रकरणाची गंभीरता घेऊन गवई राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट् च्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांना पोलिसांच्या कारवाई च्या निष्काळजी पणा चे निवेदन पाठवणार असल्याचे सांगितले आहे.
💢💢💢💢💢💢💢💢
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.



