Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsलिचडे, राऊत व राजोटे वसुलीत टॉप गियर वर? मधुमख्खी सारखी वसुली गुरग्या...

लिचडे, राऊत व राजोटे वसुलीत टॉप गियर वर? मधुमख्खी सारखी वसुली गुरग्या नी साफ केली पोळ!

नागपूर/चंद्रपूर
25 मे 2025
(सुशांत घाटे )
…….,……………………………………
बंडू उर्फ अशोक, कैलाश, अक्षय, चंदू, श्यामवतारी, मनोरंजन व बबलू अशी पूर्ण टीम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन दुय्यम निरीक्षकांच्या वसुलीची जवाबदारी चंद्रपूर जिल्ह्यात पार पाडत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे?

अभिजित लिचडे, प्रमोद राजोटे व संदीप राऊत हे तीन राज्य उत्पादन शुल्क विभागातील त्रिदेव आपल्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातून आतापर्यंत वसुली गुरग्या मार्फत लाखोची महिन्याकाठी भ्रष्ट यंत्रणा उभारण्यात मेरिट आले आहे!
चंद्रपूर शहराच्या केंद्र स्थानी विराजमान दुय्यम निरीक्षक अभिजित लिचडे प्रमुखतेने फ्रंट फूट वर फालदांजी करत आतापर्यंत भ्रष्टाचाराची सेंचूरी ठोकून बसल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे?
मॉर्निंग शो पासून तर नाईट शो पर्यंत लिचडे आपल्या टीम सोबत संपर्कात असतात. अवैध दारू तस्करी पासून बेधडक मद्य विक्री करिता त्यांचा मुखवटी दुजोरा हा आर्थिक भ्रष्टाचाराच्या रूपरेषेतून विजेच्या कडक्यासह माफदंड करत असतात!
त्यांच्या या कार्यप्रणाली ला टॉप गियर म्हणून महाकाली कैलाश नावाचा व्यक्ती चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागात महिन्या काठी संपूर्ण वसुलीचा फेरफटका मारत लिचडे साहेबांना अनामत राशी चा
कलेक्शन चार्ट आणून देतो!
याच्या सोबतीला चंद्रपूर शहरातील मनोरंजन बार सुद्धा आहे. या मोहिमेत उरले सुरले पुडके रंजन करत मनोरंजन बार च्या दिशेने धाव घेतात आणि लिचडे साहेबांचा विशेष उपहार विशेष लग्नाच्या पत्रिकेत अहेर म्हणून देतात.
माय टीम इज आल्वेज रेडी म्हणत 15 लोकांचा मॉर्निंग शो चा कॅप्टन बबलू भाई लिचडे ची खूप सेवा करतो. मॉर्निंग शो(सकाळ पासून बार उघडण्या करिता)साठी पूर्ण पणे सहकार्य करणाऱ्या अभिजित सरांची दर महिन्याला गुड कलेक्शन चा महिना बाय हॅन्ड मिळवत हातात पोहचवून देतो.
एकूणच काय तर लिचडे एव्हरग्रीन उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून नामांकित झाले आहे. लाखों रुपयाची दर महिन्याला संगीत खुर्ची खेळत हा दुय्यम निरीक्षक आता बदलीच्या प्रतीक्षेत लागला आहे.
बदली साठी प्रतीक्षेत असणाऱ्या या अधिकाऱ्यांची गुणवत्ता सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागात तपासल्या जात आहे. डेली पोस्ट मार्टम आणखी माहितीसह यांची संपूर्ण पोलखोल लवकरच करणार आहे.

दुय्यम निरीक्षक प्रमोद राजोटे करतात वसुलीचे पूर्ण कोटे?
वरोरा डिव्हिजन अंतर्गत घुघूस, दुर्गापूर आणि चिमूर चा अतिरिक्त कार्यभार राज्य उत्पादन शुल्क विभागातील प्रमोद राजोटे उत्तम रित्या पार पाडतात. DDC च्या अगदी जवळचा चेहरा मानल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्याचा जिल्ह्यातील सर्वच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांशी थेट संबंध येतो तो म्हणजे नागपुरी बिग बॉस चासू च्या कलेक्शन साठी? रिटायर होण्या च्या स्टेज वर असलेल्या राज्य उत्पादन शुल्क चा एक चासू च्या चाफलुसी हा “कर ” म्हणून आकारात असल्याची गोपनीय माहिती डेली पोस्ट मार्टम ला एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दिली आहे!
नागपुरी कर वसुली नंतर घुघूस, दुर्गापूर आणि चिमूर करिता वेगवेगळ्या रजिस्टर दलाला मार्फत हा अधिकारी स्वतःचा डल्ला मारण्यात वस्ताद आहे!
बंडू घुघूस क्षेत्राची वसुली करतो तर अक्षय दुर्गापूर ची चिमूर हा अतिरिक्त कार्यभार असल्याने विशेष व्यक्ती ची गोपनीय उभारणी केली असल्याची माहिती आहे. महिन्या काठी वसुलीची यादी चेक करणाऱ्या राजोटे पूर्ण कोटे करण्यात मास्टर म्हणून ओळखल्या जातो?वरोरा निरीक्षक विकास थोरात सध्या या महिन्यात सायलेंन्ट मोड वर दिसत आहे. त्यांचा हितचिंतक शेलार, साहेब काय करू आणायला जाऊ का करत आहे?

होशियार.. सावधान… संदीप राऊत चा तडाखा!
स्वतःला चाणक्य पेक्षा कमी न समजणाऱ्या राजुरा राज्य उत्पादन शुल्क डिव्हिजन मधला निरीक्षक अभिनंदन कांबळे यांचा विशेष उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप राऊत हे बाल हवेत फेकण्यात हुशार म्हणून विभागात ओळखल्या जाते. मूल – सावली यां डिव्हिजन ची जवाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांची संपूर्ण अवैध वसुली श्याम वतारी नावाचा खाजगी इसम करतो. महिन्याकाठी हा महाशय देशी भट्टी, बार, बियर शॉपी तसेच अवैध दारू विक्रेत्यां कडून लाखोचा गल्ला वसुलीचा राऊत ला पोहचवून देत असल्याची विश्वसनीय माहिती डेली पोस्ट मार्टम ला मिळाली आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी दालनात अवैध दारू विक्री संदर्भात तसेच बनावट दारू व अनियमितता बाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभाग यांच्याशी चर्चा सुरु असताना जिल्हाधिकारी ने कारवाई करण्याच्या कडक सूचना दिल्या! जिल्हाधिकारी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करा म्हणत असताना दुय्यम निरीक्षक चाणक्य बुद्धीने जागृत झाला आणि साहेब थोडा वेळ द्या कारवाई करणार म्हणून वेळ मारून नेण्यात यशस्वी झाला. गेल्या दोन तीन वर्षात वेळ असताना माश्या मारणाऱ्या यां अधिकाऱ्याची बदली आता शेवटच्या टप्प्यात आहे. थोडा वेळ द्या.. म्हणून फुर्रर्रर्र.. उडून जाण्याच्या बेतात असणाऱ्या यां अधिकाऱ्याने चांगलीच मोहमाया उभारली आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या राजुरा निरीक्षक अभिनंदन कांबले यांचा उजवा हात म्हणून यां अधिकाऱ्याची ओळख आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात यां तिन्ही ही दुय्यम निरीक्षकांनी वसुली अभियानात कुठलीच कसर बाकी ठेवली नाही आहे. दोन दुय्यम निरीक्षक बदलीच्या प्रतीक्षेत वाट बघत आहे. मात्र महाराष्ट्र च्या कोठल्याही कोण्यात यां वसुलीबाज अधिकाऱ्यांची पोस्टिंग झाली तरी डेली पोस्ट मार्टम
यांचे वसुली रहस्य जनते समोर आणणार…….

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!