चंद्रपूर -22 फरवरी
(सुशांत घाटे )
चंद्रपूर जिल्ह्यातील काल रात्री पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. त्यात प्रामुख्याने चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांची आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे बदली करीत त्यांच्या जागी भद्रावती येथील पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना स्थानिक गुन्हे शाखेची जवाबदारी दिली आहे.
त्यां सोबतच दुर्गापूर येथील महिला पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांना भद्रावती येथला पदभार तर निशिकांत रामटेके यांना दुर्गापूर चा पदभार देण्यात आला आहे.
बरेच लोकांनी हॉट ब्रँच असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला प्रयत्न चालवले असताना रात्री आलेल्या आदेशाने अनेकांची झोप उडाली आहे. 
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

