Friday, April 17, 2026
HomeBreaking NewsLCB ने पकडलं डुप्लिकेट देशी - विदेशी दारूचा 530 पेटीचा जखीरा, तर...

LCB ने पकडलं डुप्लिकेट देशी – विदेशी दारूचा 530 पेटीचा जखीरा, तर उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा नी पकडल्या 15 देशी चे टिल्लू?

BIG  BREAKING NEWS 

चंद्रपूर -(1 मे 2025)

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने चिमूर येथे बनावट दारू संदर्भात मोठी कारवाई करत 530 पेटींचा देशी, विदेशी तसेच बियर चा साठा आज सकाळी पकडला आहे.वर्धा जिल्ह्यातून डुप्लिकेट दारूचा साठा येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी आपले पथक लावत हा जखीरा पकडण्यात मोठे यश मिळवले आहे. डुप्लिकेट असलेल्या देशी दारू च्या 350 पेटी, रॉयल स्टॅग कंपनी च्या 100 तर किंगफिशर कंपनी च्या 80 पेटी आयचर वाहणातून पोलिसांनी चिमूर येथे पकडला आहे.

वर्धा जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीचा सम्राट असणाऱ्या चंदन खेडे नावाच्या व्यक्तीचा हा साठा असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. LCB च्या या धडाकेबाज कारवाईने मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यात डुप्लिकेट दारूची ही तिसरी कारवाई पोलिसांनी केली आहे. मात्र ज्या विभागाच्या खांद्यावर जवाबदारी आहे ते फक्त अवैध दारू च्या 10-15 देशी दारूच्या बॉटल पकडण्यात तल्लीन होऊन शाबाशी ठोकत आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अवैध दारू संदर्भात कठोर कारवाई करण्याच्या सूचना LCB ला दिल्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हायातील अवैध दारू विक्रेत्यावर व सप्लाय करणाऱ्या वर नजर वाढवली आहे. मात्र उत्पादन शुल्क चे काही अधिकारी वसुली च्या च फंड्यात गुंतलेले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!