चंद्रपूर -(1 मे 2025)
–सुशांत घाटे
🌟झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कितीतरी लोकांचा खेळ अंगाशी कर्जबाजारी होऊन जीवावर बेतला आहे.
मात्र उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदावर नौकरी वर लागताच झटपट आडवी दारू बॉटल ला उभी करण्यासाठी खेळण्यात आलेल्या योजनेत एक -दोन नवे तर चक्क 75 करोड च्या वर भ्रष्टाचाराला अंगारा देणारा दुय्यम अधिकाऱ्याने ताबडतोब फलंदाजी केल्याचे विश्वसनीय वृत्त सूत्राद्वारे मिळाले आहे.
👉JP चा विक्रम? 75 कोटीची माया….
जिवती तालुक्यातील छोटयाश्या गावातील महाराजगुडा येथून असणाऱ्या जगदीश पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठा विक्रम गाजवल्याचे वृत्त आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटली असता एकाधिकारशाही चालवत या दुय्यम अधिकाऱ्याने तब्बल 75 कोटीची उच्चतम भ्रष्टाचारातून माया जमवत चल अचल संपत्ती जमवली आहे?
जिल्ह्यातील “As it is ” बार सुरु करण्याकरिता या महाशयाने प्रत्येकी बार धारकाकडून 2-3 लाख रुपये घेतले असल्याचे गोपनीय वृत्त डेली पोस्टमार्टम ला मिळाले आहे.
👉2021 ते 2023 पर्यंत चंद्रपूर उपनिरीक्षक पदावर राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन लायसन्स देण्यापासून ते वसुलीच्या फंड्यातुन करोडोची खेळी जगदीश पवार यांने भ्रष्टाचारातून खेळली आहे?
नियमांना ढाब्यावर बसवून बेकायदेशीर परमिट रूम, CL-3 चे लायसन्स देण्यामध्ये कुठलीही कसरत या महाशयाने ठेव्हली नाही आहे?
👉बार धारकांने पैसे नाही दिले तर सासऱ्याच्या नावाने केला फ्लॅट?
🌻भद्रावती मध्ये एका बार धारकाने भ्रष्टाचाराचे पैसे न दिल्याने त्याचा फ्लॅट चक्क सासऱ्याच्या नावाने रजिस्ट्री मारून घेतल्याचे ही समोर आले आहे?
लायसन्स साठी आठ लाख रुपयेची बोली झाली, त्यानंतर लायसन्स बहाल करून देण्यात आले. नंतर पैशाची वारंवार मागणी या अधिकाऱ्याने केली, मात्र मुळात बार धारकाची काही रक्कम जमली नाही तर त्यां मोबदल्यात चक्क फ्लॅट ला या अधिकाऱ्याने विक्री करून घेतले असल्याचे ही गोपनीय वृत्त आहे.
👉तीन महारथी अधिकाऱ्याची जोडी….
⚽दोन वर्षाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महारथी नी लूटमार करीत अक्षरशः प्रत्येक दिवशी आठ ते दहा लाखाचा दणका जिल्ह्यातील मद्य परवाने धारकांना दिला आहे.
एक यातील सेवानिवृत्त झाला आहे तर दुसरा गडचिरोली जिल्ह्यातील आहे.2021ते 2023 पर्यंत आय ट्वेंटी गाडीने जगदीश पवार स्वतः ड्राइव्ह करत पाटील, आणि क्षीरसागर यांना घेऊन मोठी धूम ठोकत चंद्रपूर जिल्ह्यात प्रवास करत राहिले आहे.
राहुल नावाच्या दोन परमिट रूम ला परवाने देण्यासाठी चक्क 16 लाख रुपयाचा अनुशेष भी याच अधिकाऱ्याने घेतल्याचे विश्वासनीय सूत्रांनी माहीती दिली आहे?
जगदीश पवार यांनी आपल्या कार्यकाळात नियमांना तिरंजली देत घुघूस परिसरात बुद्ध विहारा ला लागूनच अडवाणी यांच्या CL-3 भट्टी ला मागच्या बाजूने दाखवत मोठा भ्रष्टाचार करत आपल्या कार्यकाळात परवानगी दिली आहे?
🌻पवार चा फटका संजय पाटील ला ACB ट्रॅप?
⚽मागील वर्षी ACB च्या ट्रॅप मध्ये फसलेले अधीक्षक संजय पाटील आणि दोन अधिकारी मुळात तक्रार दाराची याच जगदीश पवार ने फाईल फेकली असल्याचे समोर आले आहे.
लायसन्स मंजुरी साठी पैसे न दिल्याने गोदावरी बार ची फाईल ही यानेच अटकवून ठेवली होती. त्यानंतर त्यांची फाईल रिजेक्ट पण पवार ने केली होती.
त्यानंतर नव्याने पुन्हा कागदपत्रे बनवत गोदावरी बार च्या संचालका ने बियर शॉपी साठी अर्ज केला. तरीही भ्रष्ट यंत्रणा ने परत पैशासाठी दिलेल्या त्रासासाठी त्यांनी हा ट्रॅप लावला होता हे विशेष.
💢बघा जगदीश पवार यांची प्रॉपर्टी अगदी दोन वर्षात किती च्या घरात…( सूत्रांची माहिती)
1)जीवती तालुक्यात 2023 मध्येच 70 एकर शेती चा सौदा
किमंत – 6 कोटी 30 लाख (अंदाजित )
2) तीन JCB मशीन चे मालक
किमंत – 1 कोटी 80 लाख (2023 मध्येच)
3) चंद्रपूर -दाताळा रोड वर आलिशान बंगलो
—किमंत – 2:50 कोटी
घरात सर्वात लाखोचा महागडा झूमर…
(30 लाख रुपये लोन दाखवण्यासाठी)
4)भद्रावती मध्ये सख्ख्या सासऱ्या च्या नावाने घेतला फ्लॅट…
किमंत -15 लाख अंदाजित
5)होंडा I-20 गाडी नंतर क्रेटा गाडीचे नवीन मॉडेल 2024 ला
किमंत -23 लाख रुपये ( अंदाजित )
6)चंद्रपूर, नागपूर येथे जवळपास 15 प्लॉट किमंत -12 कोटी रुपये अंदाजित
7)जवळपास 8कोटी रुपयाचे सोने खरेदी केल्याचे विश्वासनीय वृत्त…
8) 12 कोटी नगदी स्वरूपाची चल अचल संपत्ती नातेवाईकांच्या नावाने असल्याची गोपनीय माहिती….
9) महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात यांचे घर…महाराजगुडा
सरपंच-महाराष्ट्र तर उपसरपंच तेलंगणा राज्याचा चा दोन्ही ही घरातीलच व्यक्ती…
10) नागपुरात आलिशान 1:50 कोटींचा फ्लॅट…..
संपूर्ण माहिती डेली पोस्टमार्टम ला ही विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
जगदीश पवार यांचा कार्यकाळ प्रचंड भ्रष्टाचार ने गाजला होता?
भरारी पथक च्या इन्चार्ज शिप पासून ते मूल डिव्हिजन पर्यंत त्यांनी भरारी घेण्यात कुठलीच कसरत बाकी ठेवली नव्हती हे तितकेच विशेष अल्पवधीतच 75 कोटीची माया त्यांनी जमवत मोठं भ्रष्टाचाराचे गबाड त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला बदनाम करत पायेमुळे रोवत नेले आहे?
लवकरच बांधील खिळा.. अदृश्य अमित ची गडचिरोली प्रॉपर्टी
पाटील चा सेवानिवृत्त जल्लोष….
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

