⭐चंद्रपूर -(28 एप्रिल 2025).⭐
..वार होता रवी चा, महफिल बसली पत्त्याच्या जुगारावर… पत्ते पिस्सिंग. पिस्सिंग करत… थ्री कार्ड चा डाव शहरातील एका हॉटेल च्या रूम मध्ये सुरु झाला लाखो च्या घरात जुगाराचे गब्बर एक – एक करत जमा होत सलामी देत पत्ते खेलने आयो भायो करत राहले… पत्याचा डाव जोरदार त्यां हॉटेल च्या आवारात ओरडला…प्रत्येक रविवार चा खेलो भायो थ्री कार्ड चा मात्र हा वार.. वाघाच्या डरकाळीत येऊन पडला आणि एकाच ठिकाणी दस नंबरी जुवारी पकडल्या गेले.
जुगाराचा डाव भडकला असताना अट्टल जुगाराच्या आहारी असलेल्या थ्री कार्ड वर पैशाचा डाव खेळणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील गब्बर व्यापाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने(LCB) शहरातील एका हॉटेल वर धाड टाकत काल रात्री अटक केली.
पोलिसांच्या या धाडीने व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली… भागो भायो करत चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती चे व्यापारी उठून उभे झाले मात्र आधीच लॉक अप च्या क्षेत्रात बसून असलेले हे व्यापारी पोलिसांच्या तावडीत आरामदायक अवस्तेत सापडले.⭐⭐कोन आहे अटकेत आलेले व्यापारी….
या जुगार बहादूररामध्ये पडोली येथील मनोज किराणा चे संचालक दिलीप जेठवानी, भद्रावती चे संतोष शामराव आमने ,योगेश्वर पंडित, नारियल पाणी चे ठोक विक्रेते समीर उराडे, भोला दास, हमीद अजीम शरीफ तसेच बल्लारपूर चे मोठे व्यापारी गोवर्धन चंदेल व प्रभाकर येनगनलेवार, उमेश खाटीक यांना तीन लाख रुपयाच्या नगदी रक्कम सहित अटक करण्यात आली आहे.
पोलिसांची ही कारवाई रात्री उशीरा पर्यंत सुरूच होती या आरोपीना रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर त्यांची जामीनावर सुटका ही झाली. पण मात्र जेठा भाई पकडा गयो म्हणून शहरात मोठी चर्चा रंगली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

