चंद्रपूर-10 एप्रिल 2025
(सुशांत घाटे)
🌟राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या SIT च्या चौकशीत अडकून बसला असताना, हफ्तेखोरीत मात्र त्यांनी अव्वल दर्जा प्राप्त केला आहे?
जिल्यातील परवाना धारकांकडून 13 वा हफ्त्या वसुली साठी जिल्ह्यातील दोन मद्य संघटना नी मार्च महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत नुतनीकरणासाठी तेरावा महीना राज्य उत्पादन शुल्क विभागाला अतिरिक्त देण्यासाठी सोपोस्कार करत पार केला.
बबलू आणि बिट्टू च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व दारू दुकानाच्या लायसन्स धारकांनी अधिकाऱ्याची रक्कम गोळा करत जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हस्तानतरीत केली!
शहरातील एका बड्या हॉटेल मध्ये ही डिलिंग करीत 2 कोटी चा उपहार वेगवेगळ्या डिव्हिजन क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना देत नूतनी करण चा डाव पार केला.
परमिट बार धारकांकडून प्रत्येकी 17 हजार रुपये, देशी दारू च्या दुकानाकडून प्रत्येकी 25 हजार रुपये, प्रत्येकी वाईन शॉप कडून40 हजार रुपये तर निवडक बियर शॉपी कडून 2 ते 10 हजार रुपया पर्यंत अनामत रक्कम घेत नूतनिकारणाचा शिक्कामोर्तब जिल्ह्यातील मद्द्य विक्रेत्यांना देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कितीतरी परवाना धारकांना नियमात न बसताना लायसन्स देण्याचे धाडस करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगलेच उत्पादन लाचेच्या रकमेत केले आहे.
अवघ्या चार वर्षात 100 कोटिहून अधिक भ्रष्टाचार चंद्रपूर जिल्ह्यात बहरून गेला असतानाही मात्र यांचा मोह आता अधिक वाढल्याचा चा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे.
चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल असे जिल्हायातील अनेक ठिकाणी हुकूमत गाजवणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चेहरा मोहरा भ्रष्टाचाराच्या आहारी गिळणकृत डब्बा झाला आहे.
कारवाई चा फास आणि नियमांची ताकीद देणारी राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या यादीत सर्व प्रथम क्रमांक पटकवानारा विभाग बनला आहे. ACB च्या ट्रॅप मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर अधीक्षक संजय पाटील ला अटक ही झाली होती. दोन अधिकारी सुद्धा या अभियानात पकडल्या ने यांचे बिंग फुटले होते.
अश्रूच्या नळकंडया फोडणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला ACB च्या धडाकेबाज पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले नी चांगलेच उलटे करीत धारेवर धरले होते.
महिना दीड महिना शांत अवस्तेथ बसलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांना मात्र लाच घेतल्या शिवाय झोप येत नव्हती!
कुठेतरी त्यांच्या इगोला हार्ट अटॅक आला होता, पुन्हा जोमाला कामाला लागण्यासाठी बैठका घेत रीतसर पटरी वर गाडी आण्याणसाठी त्यांनी फील्डिंग करीत मद्द्य विक्रेत्यांना सबुरीचे सल्ले सुद्धा दिले.
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या लाचखोर तालमीतला जुना सहकारी वरोऱ्यातील थोरला यांनी कार्यभाराची पूर्णतः करत आता पर्यंत 20 कोटिहून अधिक ची मालमत्ता चल अचल रूपात गोळा करून आघाडी केली आहे.
SIT चे प्रमुख संदीप दिवाण राज्य शासनाला चंद्रपूर जिल्ह्यातील बेकायदेशीर लायसन्स वाटप आणि भ्रष्टाचार लवकरच अहवाला मार्फत सादर करणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागानी चक्क नझुल च्या जागेवर सुद्धा देशी दारूचे दुकान थाटून दिले आहे, तर तंत्रनिकेतन च्या बाजूलाच शहराबाहेर अगदी 15 मीटर अंतरावार परमिट बार ला परवानगी दिली आहे. लाखोचा मल्लिदा खात शासनाच्या नियमाला धुळफेक करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक करामती सध्या बाहेर येऊ लागल्या आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

