Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsतडकाफडकी बल्लारपूर ठाणेदार सुनील गाडे यांची उचलबांगडी... ACB ट्रॅप चा फटका... श्याम...

तडकाफडकी बल्लारपूर ठाणेदार सुनील गाडे यांची उचलबांगडी… ACB ट्रॅप चा फटका… श्याम गव्हाणे नवे ठाणेदार..

चंद्रपूर -15 जानेवारी 2025

बल्लारपूर पोलीस स्टेशन ला नुकताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हुसेन शहा या पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध पन्नास हजार लाचेच्या मागणी संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. अटकेच्या भीतीपोटी हा पोलीस उपनिरीक्षक घटना स्थळा वरून 13 जानेवारी ला पळून गेला, त्याचा अटक करण्याकऱीता ACB चे युनिट मागावार आहे. खोटा गुन्ह्यात अडकवण्याची धमकी आणि कमिशन हवे म्हणून चंद्रपूर च्या व्यापाऱ्याला त्याने तगादा लावला होता. ACB नी पडताळणी करीत लाचखोर पोलीस उपनिरीक्षक याचा करेक्ट कार्यक्रम केला पण त्या अधिकाऱ्याला भनक लागल्याने तो पसार झाला आहे. मात्र याचा फटका बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांना बसला आहे. त्यांची तडकाफडकी उचल बांगडी करीत पोलीस अधीक्षक मुंम्मका सुदर्शन यांनी त्यांना कंट्रोल रूम ला बसवले आहे. बल्लारपूर चे नवीन ठाणेदार म्हणून श्याम गव्हाणे यांची वर्णी लागली आहे. श्याम गव्हाणे यांच्यावर सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना ACB चा ट्रॅप झाला आहे हे विशेष!

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!