चंद्रपूर – 04 ऑक्टोबर
✨सुशांत घाटे
👉चंद्रपूर जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षण विभागातील लाचखोरीच्या प्रकरणात तीन जणांना अटक झाल्या नंतर वर्तमान पदभार असणाऱ्या शिक्षणाधिकारी कुमारी निखिता ठाकरे यांच्या वरतीही अटकेची टांगती तलवार? लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून असल्याची विश्वासनीय माहिती आहे. ठाकरे यांचा शिक्षणाधिकारी चा पदभार (चार्ज )काढला असून शालेय शिक्षण मंत्रालयाने चंद्रपूर माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी नागपूर येथून महसूल विभागातील राजू रमाकांतराव पातले यांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे.
💥ACB च्या रडारवर? भ्रष्टखोर, लाचखोर अधिकारी…
👉ACB च्या रडारवर अनेक जिल्हा परिषद येथील शिक्षण विभागातील अधिकारी आणि लिपिक असून लवकरच त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे या ठिकाणी माहेरघर च बनवल्या असल्याचे कित्येक आरोप या ठिकाणी झाले.✨मात्र कारवाई चा बडगा कधी उभारला न गेल्याने चांगलीच भ्रष्टाचाराची मोठी चेन दलाला मार्फत आनी जमेल तसें आपल्या दालनातून चालवण्यात आली कितीतरी भ्रष्टाचारा साठी फाईले,कामे रखडून ठेवण्यात आले आहे.आता त्याचा लांब लचक यादी च तैयार होत आहे.
👉पहा काय आहे प्रलंबित?
1)वरिष्ठ श्रेणी चे प्रस्ताव प्रलंबित
2)निवड श्रेणी चे प्रस्ताव प्रलंबित
3) पदोन्नती चे प्रस्ताव प्रलंबित
4) नवीन टायपिंग इन्स्टिटयूट चे प्रस्ताव प्रलंबित
5) सिव्हिल सर्जन कडून शिक्षणाधिकारी यांच्या मान्यते साठी आलेले फाईल राखडलेले
6)जिल्हायतील शिक्षक्केतर, कर्मचारी रिक्त आणि अतिरिक्त प्रश्न अद्याप मार्गी नाही
7)मुख्ख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या पदोन्नती चे प्रस्ताव प्रलंबित..
जिल्हा परिषद च्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अंतर्गत असे कितीतरी प्रस्ताव प्रलंबित असून फक्त देणाऱ्या लोकांच्या फाईल ला हात लावण्याचा संकल्प या ठिकाणी राबविला गेल्याचे कितीतरी आरोप झाले.
भ्रष्टाचाराचा मोठा गड्डा या ठिकाणी तैयार झाल्याने लवकरकच यांची पूर्ण कुंडली तैयार करून चक्की पिस्सिंग करण्यात येणार आहे. अल्पवाधित पाच वर्षाच्या कार्यकाळात बंगले बांधणाऱ्या लिपिकालाही करोडो ची चल अचल संपत्ती शी चौकशी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.नवीन शिक्षणाधिकारी कडून प्रलंबित असलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन लवकर मार्गी लावणार का हे पाहणे गरजेचे आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.


