Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsकाँग्रेस च्या वाट्यात कोणाला चंद्रपूर मधून उमेदवारी? अंबोरे कीं झोडे! फुग्यातील गॅस...

काँग्रेस च्या वाट्यात कोणाला चंद्रपूर मधून उमेदवारी? अंबोरे कीं झोडे! फुग्यातील गॅस ची हवा निघणार? काँग्रेस च्या उमेदवाराचा निर्णय हायकामंड कडे दिल्ली दरबारीं!!

चंद्रपूर💥

(18 सप्टेंबर) –

✨सुशांत घाटे✨

विधानसभेची निवडणूक लक्षात घेत उमेदवारांची मोठी चहल पहल आप आपल्या पद्धतीने निवडणुकीसाठी नेटवर्क पद्धतीने तारांकित करीत आहे. मुख्यता काँग्रेस पक्षातील चंद्रपूर विधानसभेची तिकीट साठी दावे -दारी ठोकणाऱ्या अनेक लोकांची (उमेदवार)सूची तैयार झाली आहे. प्रत्येकाचा विश्वास आणि हायकमांड चे कुठले धोरण, या ठिकाणी स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🌟🌟🌟

जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असताना, प्रत्येक उमेदवार नी आपले टाके जवळपास लावून नेत्यांच्या भेटीघाटी सुरु केल्या आहे.
काँग्रेस च्या चंद्रपूर विधानसभेच्या कोट्यातून राजू झोडे, सुधाकर अंबोरे, डॉ. दिलीप कांबळे आणि उर्वरित यादीतील पक्षा अंतर्गत विधानसभेची सीट मागणाऱ्यांची लांब लचक उमेदवारांची यादी तैयार आहे.

🌟मात्र फक्त उमेदवारी देने म्हणजे निवडणुकीचा चेहरा नाही तर त्याला खरंच निवडून आणता येईल का याची मोठी चाचपणी दिल्ली च्या हालचाली वरून लागल्या आहे. प्रत्यक्षात पहिल्या तीन नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षात आहे. त्यातही राजू झोडे आणि सुधाकर अंबोरे यांच्या नावाला पसंदी दिली असल्याची विश्वासनीय वृत्त आहे. एक समाजसेवक तर दुसरा पोलीस विभागातील सेवा निवृत्त अधिकारी दोघांच्या परिचय पत्रात सामाजिक दृष्टीत महत्वाचे योगदान कीती!त्यांची किमया च असेल मात्र वर्तमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या साठी काँग्रेस पक्षातील या दोन्ही दावेदारा पैकी कुठलाही उमेदवार चालेल अशी अंतर्गत चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षात चालली आहे.
👉थापा घालणारा आमदार नको

असो सुरु सध्या चंद्रपुरात उमटू लागला आहे,समाज कल्याण चे आखीव पत्रिकेत काम करणारा व्यक्तिमत्व आमदार हवा अशा जनतेच्या सानिध्यात नवा पवित्रा विकसित झाला आहे.
फुघ्याचे राजकारण करणाऱ्या उमेदवाराचा या वेळी गॅस तर राहणार मात्र हवेत जातं जातं फुघ्याची गॅस उतरल्यावर जमिनी वर आदूळून पडेल अशी तूर्तास चर्चा शहरात सुरु आहे. नवीन चेहऱ्याला संधीचा एक काँग्रेस पक्षातून संधी मिळाली तर त्यांच्या विजयाची नक्की वाटचाल चंद्रपूर विधानसभेतुन उभारेल?

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!