चंद्रपूर – (6सप्टेंबर2024)
चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध ड्रग्स आणि गांज्या विक्रीचा बिमोड करण्याकरीता चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कडक धडक मोहीम राबविण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले असता सलग दुसऱ्या दिवशी ही चंद्रपूर च्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर – चंद्रपूर हायवे वर भद्रावती जवळच्या सायवन गावाजवळ दुचाकी वरून गांज्या तस्करी करणाऱ्या तीन आरोपीना नाकेबंदी करीत झडती घेत सहा किलोच्या जवळपास गांजा वनस्पती चे पाने -फुले -बियाणे ताब्यात घेत अटक केली आहे.
✨या आरोंपी विरुद्ध एन.डी.पी.एस. ऍक्ट प्रमाणे भद्रावती पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात या कारवाई ला पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, पोलीस हवालदार किशोर वैरागडे, सतीश अवथरे पोलीस शिपाई नितीन रायपुरे,गोपाल अतकूलवार,गोपीनाथ नरोटे, अमोल सावे,दिनेश अराडे, संतोष येलपुलवार, शशांक बदामवर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

