Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsबल्लारपूर चा तहसीलदार आणि तलाठी ACB च्या जाळ्यात, लाच मागणे भोवले..

बल्लारपूर चा तहसीलदार आणि तलाठी ACB च्या जाळ्यात, लाच मागणे भोवले..

चंद्रपूर -1 एप्रिल 2025

बल्लारपूर येथील तहसीलदार आणि तलाठ्याला लाच मागणे चांगलेच महागात पडले आहे. दोन लाख 20 हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या विरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड ला ताब्यात घेतले आहे तर कवडजई साझ्याचा तलाठी सचिन पुकळे याचा शोध ACB घेत आहे.

तक्रारदाराला मुरूम प्रकरणात कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दोन लाख 20 हजार रुपयाची या लोकसेवकांनी मागणी केली होती. या आधी 1लाख 19 हजार स्वीकारले असताना 1 लाख रुपया साठी आणखी या लोकसेवकांनी तक्रार दाराला तगादा लावला होता.

ACB नी पडताळणी करून या तहसीलदार आणि तलाठी च्या मुसक्या आवळत बल्लारपूर येथे गुन्हा नोंदवत आज बल्लारपूर तहसीलदार ला ताब्यात घेतले आहे.

चंद्रपूर ACB ने केलेल्या कारवाई ने महसूल प्रशासनातला भ्रष्टाचार समोर आला आहे.

सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले आणि त्यांच्या पथकानी केली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!