चंद्रपूर( 8 ऑगस्ट)
नागभीड तालुक्यातील वाढोणा ग्राम येथील समाजसेवा विद्यालयातील कनिष्ठ लिपिक मोहम्मद अकील इस्माईल शेख याला पाच हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापकलाच 15000 हजार रुपयाची लाच मागितली गेल्या होती. त्यातील पहीला टप्पा म्हणून पाच हजाराची लाच देताना या लिपीकाला अटक केल्या गेली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

