Thursday, April 16, 2026
HomeBreaking NewsACB चे दोन विभागावर चंद्रपूर जिल्ह्यत ट्रॅप ‼️चार लाचखोर अटकेत

ACB चे दोन विभागावर चंद्रपूर जिल्ह्यत ट्रॅप ‼️चार लाचखोर अटकेत

चंद्रपूर 19 जून –
चंद्रपूर जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज जिल्ह्यातील दोन ठिकाणी सापळा रचत दोन विभागाच्या चार लाचखोर आरोपीना अटक करीत भ्रष्टाचाराच्या मुसक्या आवरल्या आहे.

गृहनिर्माण संस्था मार्फत सरकारी योजना असणारी शबरी आवास योजने अंतर्गत 10000 हजार रुपयाच्या मागणी संदर्भात चिमूर येथील पंचायत समितीचे कंत्राटी अभियंता मिलिंद मधुकर वाढई व त्याचे मित्राला या प्रकरणात अटक केल्याने ही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली सलग साथवी त्यासोबतच शासकीय वैद्ययकीय महाविद्यालयातील दोन वरिष्ठ आणि कनिष्ठ बाबूनां अपघाता संधर्भात बिल मंजुरी करित 10000 रुपयाच्या लाचेच्या मागणी संधर्भात आज अनुक्रमे अशोक बबूलकर आणि दीपक सज्जनवार यांच्यावर चंद्रपूर येथे आठवी कारवाई करीत एकाच दिवशी ACB च्या दोन युनिट ही कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील भ्रष्टाचार च्या यंत्रणचे पूर्णतः पायामुळे उखळून फेकण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील भ्रस्टाचाराचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या चंद्रपूर ACB च्या पोलीस उपाअधीक्षक मंजुषा भोसले यांनी अष्टकार ठोकत आपली कारकीर्द गाजवली असल्याने भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची पायाखालची वाळूच सरकली आहे.
मागील महिन्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा ट्रॅप सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन लाचखोर अधिकाऱ्यांना करीत ACB ने मोठा दणका दिला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील भ्रष्टाचार बघता अनेक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येऊ लागल्या त्या नंतर लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचार विरोधी आपले चक्रवृह रचित सापळा कारवाई करीत लाचखोराच्या मुसक्या आवरल्या आहे.

जिल्ह्यातील आणखी काही अधिकारी हे लवकरच ACB च्या रडारवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृवांत पोलीस निरीक्षक (ACB )जितेंद्र गुरनुले आणि त्यांच्या टीम ने केली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!