Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsइंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या 4 खेळाडूंचा विभागीय स्पर्धेत निवड

इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या 4 खेळाडूंचा विभागीय स्पर्धेत निवड

इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या 4 खेळाडूंचा विभागीय स्पर्धेत निवड

चंद्रपूर : इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या 14 वर्षांखालील क्रिकेट संघातील चार खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येथील जिल्हा स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय स्पर्धेत शाळेचा १४ वर्षाखालील वयोगट संघ उपविजेता ठरला होता. जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांतील कामगिरीच्या आधारे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे .

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये इयत्ता आठवीचे विद्यार्थी अनुराग अंबाडे, कुणाल हिंगोराणी, सोहम मालखेडे आणि मिकाईल अली हेयांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल चव्हाण आणि रेशमा पठाण यांनी प्रशिक्षण दिले. प्राचार्य बावनी जयकुमार यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले व त्यांच्या विभागीय स्तरावरील चाचण्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल पुगलिया, समितीचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे प्रशासक जयकुमार सर, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!