विशेष बातमी: चंद्रपूरच्या ‘भ्रष्टाचारी टायटॅनिक’ला रोखण्यासाठी ACB ची मोठी फेरबदल! गडाचा नवा किल्लेदार कोण?
चंद्रपूर | सुशांत घाटे
ज्याप्रमाणे ‘टायटॅनिक’ जहाज आपल्या अवाढव्य आकारामुळे कधीच बुडणार नाही असं वाटलं होतं, पण एका हिमनगाला धडकून ते समुद्राच्या तळाला गेलं; अगदी तसंच चित्र सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या भ्रष्टाचारी साम्राज्याबाबत दिसत आहे. भ्रष्टाचार रुपी अथांग सागरात डोलणाऱ्या या ‘टायटॅनिक’ला रोखण्यासाठी आता लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आपली रणनिती बदलली आहे!
महाराष्ट्र राज्य लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आज जारी केलेल्या आदेशानुसार, चंद्रपूरच्या भ्रष्टाचाऱ्यांना घाम फोडणाऱ्या मंजुषा भोसले यांची बदली आता अमरावती येथे झाली आहे. मात्र, चंद्रपूरचा हा ‘भ्रष्टाचाराचा गड’ पुन्हा एकदा सर करण्यासाठी आणि इथल्या सिहासनावर वचक बसवण्यासाठी अनिल जिट्टावार यांची नागपूरहून पुन्हा चंद्रपूरच्या रणांगणात ‘एन्ट्री’ झाली आहे!
🔥 जिट्टावार परतले… आता भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणणार की गहिवरनार?
चंद्रपूर जिल्हा म्हणजे भ्रष्टाचाराचा अभेद्य गड मानला जातो. वाळू माफिया, कोळसा तस्करी आणि शासकीय कार्यालयातील ‘टेबलखालचे’ व्यवहार यामुळे हा जिल्हा नेहमीच चर्चेत असतो. या गडाला सुरुंग लावण्यासाठी आता पुन्हा एकदा खूपच डॅशिंग अधिकारी अनिल जिट्टावार यांच्याकडे चंद्रपूरची धुरा सोपवण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी स्वतः ट्रॅफिक, आणि पोलीस स्टेशन ला काम केले आहे, त्यापैकी त्यांना बऱ्याच भ्रस्टाचाराच्या कहाणी कथा माहिती च असेल,जिट्टावार यांचा अनुभव आणि कामाची पद्धत पाहता, भ्रष्टाचाराच्या ‘टायटॅनिक’ला छिद्र पडणार हे आता निश्चित झाले आहे.
📋 ACB च्या बदल्यांची ‘स्पेशल १३’ यादी: आता कोणाचे सिहासन हलणार?
चंद्रपूरच्या भ्रष्टाचाराचा हा गड कोण राखणार? जिट्टावार यांचा हा ‘सेकंड इनिंग’चा वार कोणावर पडणार? मंजुषा भोसले यांनी निर्माण केलेला दबदबा आता जिट्टावार पुढे कसा नेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
|
अ.क्र. |
अधिकाऱ्याचे नाव |
सध्याचे ठिकाण |
बदलीचे नवीन ठिकाण |
|---|---|---|---|
|
१ |
श्रीमती शैला शंकर कोरडे |
लाप्रवि, मुंबई |
लाप्रवि, सातारा |
|
२ |
श्री. विशाल शिवाजी जाधव |
लाप्रवि, ठाणे |
लाप्रवि, मुख्यालय |
|
३ |
श्रीमती संगीता शंकर पाटील |
लाप्रवि, छत्रपती संभाजीनगर |
लाप्रवि, सिंधुदुर्ग |
|
४ |
श्री. प्रशांत अनंतराव पवार |
लाप्रवि, नांदेड |
लाप्रवि, छत्रपती संभाजीनगर |
|
५ |
श्री. मंगेश पद्माकर मोहिते |
लाप्रवि, अमरावती |
लाप्रवि, नागपूर |
|
६ |
श्रीमती मंजुषा मधुकर भोसले |
लाप्रवि, चंद्रपूर |
लाप्रवि, अमरावती |
|
७ |
श्री. राजेश वसंत वाघमारे |
लाप्रवि, सातारा |
लाप्रवि, छत्रपती संभाजीनगर |
|
८ |
श्री. संतोष ध्यानसिंग सुर्य |
लाप्रवि, लातूर |
लाप्रवि, नांदेड |
|
९ |
श्री. अरुणकुमार लक्ष्मण लोहार |
लाप्रवि, भंडारा |
लाप्रवि, नागपूर |
|
१० |
श्री. चंद्रकांत सिद्धार्थ मच्छी |
लाप्रवि, मुंबई |
लाप्रवि, लातूर |
|
११ |
श्री. अनिल मोहनरेड्डी जिट्टावार |
लाप्रवि, नागपूर |
लाप्रवि, चंद्रपूर |
|
१२ |
श्री. निलेश सुरेश लोधी |
लाप्रवि, मुख्यालय |
लाप्रवि, गोंदिया |
|
१३ |
श्री. प्रविण विश्वनाथ पाथरे |
लाप्रवि |
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

