Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsगृह विभागाचे बदली आदेश धडकले, SP अनुराग जैन यांची उचलबांगडी तर ब्रम्हपुरी...

गृह विभागाचे बदली आदेश धडकले, SP अनुराग जैन यांची उचलबांगडी तर ब्रम्हपुरी चे वादग्रस्त SDPO राकेश जाधव यांचीही बदली.. वर्धा जिल्ह्याचे नवीन बॉस SP सौरभ अग्रवाल!

 पोलीस दलात मोठे फेरबदल; एसपी अनुराग जैन यांची उचलबांगडी, सौरभ अग्रवाल नवे पोलीस अधीक्षक
​चंद्रपूर:(सुशांत घाटे)

राज्य गृह विभागाने आज पोलीस दलात मोठे फेरबदल करत वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी आता पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) सौरभ अग्रवाल यांची वर्ध्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🍁ड्रग्ज प्रकरण भोवल्याची चर्चा?

नुकतेच वर्धा जिल्ह्यात ‘महसूल गुप्त संचालनालय’ (DRI) ने मोठी कारवाई करत अमली पदार्थांचा (Drugs) प्रचंड साठा जप्त केला होता. गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणानंतरच गृह विभागाने हे कडक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

गृह विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश नुकतेच जारी केले असून, सौरभ अग्रवाल लवकरच आपला पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

​​वर्धा चे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली आता पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण (PCR), नागपूर या पदावर करण्यात आली आहे.
​ पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) अधीक्षक सौरभ अग्रवाल हे आता वर्ध्याचे नवीन पोलीस अधीक्षक (SP) असतील.

BREAKING NEWS

ब्रम्हपुरीचे वादग्रस्त SDPO राकेश जाधव यांची अखेर बदली; अधिवेशन गाजल्यानंतर कारवाई

चंद्रपूर: सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेले ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) राकेश जाधव यांची अखेर बदली करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जाधव यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते, ज्याची दखल घेत गृह विभागाने हे आदेश काढले आहेत.

​🍁नेमके प्रकरण काय?
राकेश जाधव यांच्यावर ५० हजारांच्या लाचखोरीचा आणि वाळूने भरलेला एक हायवा ट्रक १० दिवस बेवारस स्थितीत पोलीस ठाण्यात ठेवून कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा आरोप होता. या प्रकारामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू होती आणि अहवाल महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आला होता.
​🌟अधिवेशनात गदारोळ:
सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला. विजय वडेट्टीवार यांनी जाधव यांच्या कार्यपद्धतीवर आणि भ्रष्टाचारावर थेट विधानसभेत आवाज उठवला होता. वाढता जनक्षोभ आणि लोकप्रतिनिधींचा दबाव पाहता शासनाने त्यांची उचलबांगडी केली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!