*चंद्रपूर -1 ऑगस्ट 2025*
*सुशांत घाटे*
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बनावट दारू ची कारवाई केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एका आरोपीला अटक करत, बनावट देशी दारू ची पाचवी मोठी कारवाई ठोकत 150 पेटी ची महिंद्रा पिकअप वाहनाला वरोरा तालुक्यातील पांझूर्नी येते पकडण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आता पर्यंत बनावट दारू चे कंटेनर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले आहे. यापूर्वी कोरपना, चिमूर, बल्लारपूर, गोंडपिपरी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने बनावट दारू च्या मोठं मोठया कारवाई केल्या आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हॉट ब्रँच ने सध्या कारवाई च्या बाबतीत जिल्ह्यात धूम मचवली आहे.ड्रुग्स, अग्निशस्त्र, जनावर सारख्या मोठ्या कारवाई ने गुन्हेगारीला संपुष्टात आणण्याचे काम सध्या चंद्रपूर जिल्हा पोलिसांकडून अग्रेसर सूरू आहे.
👉 *वर्धा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुठे? SP अनुराग जैन चे नियंत्रण नाही का…..*
💢वर्धा जिल्ह्यातून खेप येत असताना वर्धा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पोलीस कुठे लक्ष घालत आहे की यांचे याच्याशी काही संबंध आहे याचा शोध घेणे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना गरजेचे झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे पोलीस अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगणघाट मार्गे माढेळी वरून बनावट देशी दारू चा साठा येत असताना जे चंद्रपूर पोलिसांना जमते ते वर्धा पोलिसांना का जमत नाही हा चर्चेचा विषय सध्या पोलीस विभागातील वरिष्ठ पातळीवर रंगला आहे.
👉चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाला कुलूप लावून बरखास्त करण्याची गरज?
👉वेशीवर लक्तरे टांगलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी फजिती झाली आहे. फक्त वसुलीनामा जमा करण्यात उस्ताद असणाऱ्या काही अधिकाऱ्यांना फक्त फॉर्मलिटी म्हणून हा जॉब करण्यात रस आहे. आंब्यातील रस चूरपून गुही फेकून देणाऱ्या या निवडक अधिकाऱ्यांना अद्याप कुठलीच ठोस कारवाई करता न आल्याने फक्त ससेमीरा सारखे कागदावर धावत आहे! चंद्रपूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालया ला आता कुलूप लावून अधिकाऱ्यांना बरखास्त करण्याची गरज निर्माण सध्या झाली आहे? आणि त्याच्या चाब्या पोलीस विभागाला सुपूर्द करण्याची आवश्यकता दिसत असल्याची जनमाणसात चर्चा रंगली आहे. ज्या उत्पादन शुल्क विभागावर बनावट दारू ची तस्करी रोखण्याची जवाबदारी आहे. ते फक्त आरामदायक वातानुकुलीत खोलीत बसून गप्पा हाणत आहे? भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या या विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे पोस्टमार्टम आम्ही उघड केले आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

