Wednesday, August 26, 2026
HomeBreaking Newsमहाराष्ट्र पोलीस : राज्यातील 65 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आज मुहूर्त गृह...

महाराष्ट्र पोलीस : राज्यातील 65 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आज मुहूर्त गृह विभागाला सापडले…

मुंबई /चंद्रपूर
31 जुलै 2025 (सुशांत घाटे)
राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा प्रतीक्षेत असलेले बदलीचे आदेश आज महाराष्ट्र गृह खात्याने काढले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे मुहूर्त अखेर आज गृह खात्याला मिळाली आहे.

65 अधिकाऱ्यांच्या बदल्या…
राज्यातील अनेक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीवरून राज्यातील महाराष्ट्र सरकार मध्ये बरेच गोंधळ निर्माण झाले होते. राजकीय डावपेच साधणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये शिफारशीचे राजकारण आड आल्याने बरेच खलबत्ते राजकीय क्षेत्रामध्ये आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
गुन्हेगारीचा खात्मा करणारा कर्दनकाळ आता हिंगणघाट मध्ये 

नांदेड इतवारी ग्रामीण चे पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांची वर्धा जिल्ह्यातील हिंगनघाट येथे बदली करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून सुशील नायक यांची प्रतिमा आहे. त्यांनी या पूर्वी चंद्रपूर, वणी, गडचांदूर आणि नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीला चाबूक लावून सरळ केल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. पोलीस विभागातील उत्तम अधिकारी म्हणून सुशील नायक यांचं नाव घेतल्या जाते. अनेक रहस्यमय गुन्ह्याचे त्यांनी शोध लावत आरोपींना बेड्या ठोक्ल्या आहे.

बघा लिस्ट…… DYSP /ACP 

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!