Tuesday, August 25, 2026
HomeBreaking Newsबोगस पत्रकारांचा खेळ खल्लास! जंगली कुत्र्या सारखे वसुली चावें? चोरांची गँग पत्रकारितेत...

बोगस पत्रकारांचा खेळ खल्लास! जंगली कुत्र्या सारखे वसुली चावें? चोरांची गँग पत्रकारितेत सक्रिय….

चंद्रपूर -22 जुलै
(सुशांत घाटे)

💢सध्या सोशल मीडिया वर बोगस पत्रकारांची वसुली चा विडिओ चर्चेत आहे. पत्रकारिता च्या नावावर जिल्ह्यात काही बोगस भामट्या पत्रकारांनी धुमाकूळ घातला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील या भामट्यानी गडचिरोली जिल्ह्यात ही निमंत्रण पत्रिका वाटून बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांना कार्यक्रम घेण्याच्या नावाखाली बेवकूफ बनवत पावत्या फाडत “वसुली “गोळा केल्याचे उघडकीस आले आहे.

काही दिवसा अगोदर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलिसांनीही तोतया पत्रकारांना अटक ही केली होती. चारचाकी वाहन आणि रुबाब दाखवत या पत्रकारानी अवैध व्यावसायिक नां टार्गेट करत वसुलीची धूम ठोकली आहे. पत्रकारितेचा कुठलाही अनुभव नसताना बांधकाम मिस्त्री, डिझेल चोर,पेंटर, अवैध दारू विक्रेता,फूट पाथ वर असलेला बॅग विक्रेता, भंगार चोर,वॉटर फिल्टर चे काम करणारा,तसेच ज्यांचे पत्रकारिता क्षेत्रात दूर दूर पर्यंत कुठेही संबंध नसताना हे भामटे पोर्टल आणि यूट्यूब चे ओळखपत्र घेऊन स्वतःला अधिकृत ब्युरो चीफ, विशेष प्रतिनिधी, संपादक, असे नाम निर्देशीत करत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यातील पोर्टल आणि यूट्यूब च्या माध्यमातून गाडीवर प्रेस लिहीत सत्य पत्रकारितेची गळचेपी करत आहे.

जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जाऊन मिशन वसुली चा फार्मुला करत या बंडल बाज बोगस पत्रकारीतीने सध्या जिल्ह्यात पाच हजाराच्या वर पत्रकारिता चे काही भामट्या संपादकांनी आर्थिक व्यवहार करत पत्रकारिता ला दावणीवर बांधलं आहे. दर महिन्या ला वेगवेगळ्या कार्यक्रम करण्याचे आयोजन च्या पत्रिका तयार करत ज्यांचा या कार्यक्रमाशी काडीमात्र संबंध नसताना खासदार,आमदार,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरफायदा घेत भामट्यानी आज पर्यंत बरीच वसुली करत तोबा तोबा हाहाकार मचवला आहे.

💢सूट बूट तरी कधी कोट लावत एखाद्या अधिकाऱ्याला लाजवेल अशी शर्टींग सजावट करत हे बोगस पत्रकार बगळे जंगली कुत्र्या सारखे जिल्ह्यातील कधी रेती घाट तर कधी शासकीय कार्यालये गाठत आहे. चंदन देवांगण उर्फ गोलू आणि राजू निकम अशा दोन बोगस पत्रकारांचा विडिओ सोशल मीडिया वर वायरल झाला असून अवैध वसुली वरून दोघात बराच राडा झाल्याचे दिसायला मिळत आहे.

🏵️जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बोगस पत्रकारिता करणाऱ्या भामट्यावर कारवाई करण्याचे सूचना जिल्ह्यातील पोलिसांना दिल्या आहे. शहर पोलिसांनी काल चंदन उर्फ गोलू ला पोलीस स्टेशन ला बोलावून चांगलीच परेड घेतली आहे. मिस्त्री काम करणारा चंदन उर्फ गोलू चा विडिओ वायरल झाल्यावर त्यानी आवाज 24 यूट्यूब चॅनेल चा ब्युरो चीफ असल्याचे कागदपत्र दाखवले मात्र कोणत्याही यूट्यूब ला अशा आशयाचे अधिकाराच दिले नसताना असे ओळखपत्र देणे सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. शताब्दी, राजधानी एक्सप्रेस ला मागे टाकेल असे तुफान एक्सप्रेस चे ही या भामट्याने प्रतिनिधी असल्याचे सांगितले आहे. पण ज्या भामट्याचा गेल्या कित्येक वर्षापर्यंत संबंध नसताना या भामट्याला पत्रकारिता कशी कळली हा संशोधनाचा विषय आहे. पूर्वी दारू विकणारा राजू निकम हा टॅक्सी ड्रायवर होता मात्र पत्रकारिता क्षेत्रात कधी मोह नसणाऱ्या या धाकडं ला सुद्धा वसुलीचा स्टंट मिळाला आणि त्याने सुद्धा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा पर्यंत रेतीघाटावर मजल मारत वसुली साठी धाव घेतली आहे. भंडारा च्या पवनी मध्ये हा भामटा ड्रायवर च्या सीट वर बसून गाडी चालवत असताना सुद्धा विडिओ वायरल झाला आहे.

💢15 हजार रुपये घेऊन हे भामटे परत निघाले असताना यांना तेथील नागरिकांनी पकडले सुद्धा होते मात्र माफीनामे करत हे तेथून परत आले हे विशेष!

🔅यांची पेट्रोलिंग वसुली करिता….
दिवस असो की रात्र पोलिसां सारखे हे भामटे सतत पेट्रोलिंग करत वसुलीचे निरंतर अड्डे शोधत असतात. या भामट्यान सारखे अनेक बोगस पत्रकारानी जिल्ह्यातील खऱ्या पत्रकारावर मात्र वाईट वेळ आणली आहे. या सारखे अनेक बोगस बंडल बाज पत्रकारानी आज जिल्ह्यात डोके वर काढत जिल्ह्यातील सत्य पत्रकारितेची गळचेपी केली आहे.

जिल्ह्यातील
पोलिसांनी या बाबतीत कडक क्विक ऍक्शन घेत आता शोध मोहीम उभारली आहे. पोलिसांनी या बोगस पत्रकारिता करणाऱ्या विरुद्ध थेट पोलीस स्टेशन ला तक्रारी करण्याचे वार्तालाप सुद्धा काढले आहे. पण खऱ्या पत्रकारांना तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा या बोगस भामट्याचा अंत होइल?

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!