Thursday, August 27, 2026
HomeBreaking Newsबनावट ओयो गेलेत कायद्याच्या चकाटीत.. सुदर्शन नी चालवले रामबाण!

बनावट ओयो गेलेत कायद्याच्या चकाटीत.. सुदर्शन नी चालवले रामबाण!

चंद्रपूर– (19जुलै 2025)
(सुशांत घाटे)
चंद्रपूर शहरातील 15 ओयो (OYO) नावावर चालणाऱ्या हॉटेल लॉजिंग वर गैरफायदा आणि प्रवाशांची दिशाभूल तसेच बनावट चिन्हा वर पोलिसांनी कारवाई करत टाळे ठोकले आहे. राज्यातील ही पहिलीच कारवाई पोलिसांनी केली आहे.
राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अधिवेशनात ओयो हॉटेल संदर्भात बरेच प्रश्न उपस्थित केले होते. निर्जन ठिकाणी ओयो हॉटेल ची निर्मिती करून चालणाऱ्या या तासिका हॉटेल च्या मागचे रासलीला प्रकरण आता पोलिसांच्या कारवाई रूपात दिसू लागले आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आपले सुदर्शन चक्र फिरवत शहर आणि रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बनावटी नोंदीनिकृत असलेल्या हॉटेल चालकांवर थेट गुन्हे दाखल केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बरेच ओयो च्या नावाखाली हॉटेल लाजिन्ग ची संख्या वाढलेली आहे. मात्र ओयो नावाचा ट्रेडमार्क घेऊन सर्रास नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या हॉटेल व्यावसायंकींना चांगलाच दणका चंद्रपूर पोलिसांनी दिला आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!