Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsडेली पोस्टमार्टम चे ते वृत्त खरे! डुप्लिकेट दारू चा साठा LCB नी...

डेली पोस्टमार्टम चे ते वृत्त खरे! डुप्लिकेट दारू चा साठा LCB नी पकडला.. बॅच नंबर 675?

चंद्रपूर 3 जुलै 2025
सुशांत घाटे
💢💢💢
चंद्रपूर पोलिसांनी पुन्हा एकदा बनावट दारूचा लाखों रुपयाचा साठा पकडत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कानशैलीत लगावत कारवाई च्या माध्यमातून दाखवून दिले आहे.निव्वळ अवैध वसुली मध्ये गुंग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अनागोंधी कारभार चव्हाट्यावर असून चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेने डुप्लिकेट दारूच्या साठ्याला पकडण्यात यश मिळवले आहे. या आधीच डेली पोस्ट मार्टम नी डुप्लिकेट दारू संदर्भात बॅच नंबर 675 ची बनावट दारू चंद्रपूर जिल्ह्यात येत असल्याची बातमी प्रकाशित केली होती. दरम्यान छावा सारखा स्थानिक गुन्हे शाखा या मार्गांवर शोध कार्यात जुळून होता 900 पेटी चा असणारा डुप्लिकेट साठा पैकी स्थानिक गुन्हे शाखा नी 40 पेटी चा जखीरा बल्लारपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत पकडला आहे.तिकडे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी फक्त मोबाइवर हवेत उड्या मारत आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रनेला बनावट दारू संदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा नेहमी अलर्ट वर पाहायला मिळत आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वारंवार कारवाई च्या सूचना दिल्या नंतर ही ते झोपलेल्या कुंभकर्णी अवस्तेत च निद्रावस्था असल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!