चंद्रपूर( 1 जुलै 2025)-
सुशांत घाटे
💢💢💢💢💢💢
🏵️भ्रष्टाचाराच्या याने ग्रासित झालेला चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चेहरा राज्यात भ्रष्टखोर म्हणून उदयास येऊ लागला आहे.लाचखोरी, हफ्तेखोरी प्रत्येक कामाच्या मागे कागदी घोडे नाचवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही भ्रष्टखोर अधिकाऱयाची आणि दलालांची फौज च या ठिकाणी निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
वारंवार अधिकाऱ्यांच्या तक्रारी आणि भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी होत असताना कारवाई चा शून्य प्रहार करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने कडक इशारा देत कारवाई करा अन्यथा भ्रष्टखोर अधिकाऱ्यांना गाढवावर बसवून,चेहऱ्यावर काळं फासवून धिंड काढू अशा आशयाचे निवेदन दिले आहे. नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील गैरव्यवहारच्या कथा SIT समोर ही तक्रारीत नमूद केल्या आहे. SIT ची कारवाई सुरु असताना मात्र काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या रोचक कहाण्या अद्यापही समोर येत आहे.
भ्रष्टाचाराने गुर्पटून बसलेल्या राज्य उत्पादन शुल्क राजुरा निरीक्षक अभिनंदन कांबले, दुय्यम निरीक्षक भिवगडे, वरोरा चे तत्कालीन निरीक्षक विकास थोरात, वरोरा चे दुय्यम निरीक्षक प्रमोद राजोटे आणि चंद्रपूर चे दुय्यम निरीक्षक कोल्हे यांच्या नावा सहित मनसे नी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात निवेदन दिले आहे.![]()
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.


