मुंबई /चंद्रपूर
27 जून 2025
महाराष्ट्र पोलीस विभागातील बदल्या संदर्भात बऱ्याच प्रतीक्षा नंतर आज गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. राजकीय सुर गवसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात बरेच खलबत्ते आपट्ल्या नंतर सरतेशेवटी बदलीची प्रतीक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांची आज यादी आली आहे. DCP, ACP, SDPO, आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या बदल्या या यादीमध्ये धडकल्या आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची राज्य गुप्त वार्ता (SID) नागपूर ला बदली करण्यात आली आहे. तर भंडारा चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांना चंद्रपूर जिल्ह्याचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक बनवन्यात आले आहे.
बघा महाराष्ट्रातील ही पोलीस अधिकाऱ्यांची बदल्यांची लिस्ट…

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

