Thursday, April 16, 2026
HomeBreaking NewsSP सुदर्शन ची बदल्या मध्ये डॅशिंग खेळी! पारदर्शक कारभारा वर बोट उचलण्याचे...

SP सुदर्शन ची बदल्या मध्ये डॅशिंग खेळी! पारदर्शक कारभारा वर बोट उचलण्याचे कामच नाही? कारणे दाखवा नोटीस भेटणाऱ्या त्यां महीला अधिकारी कौन?

चंद्रपूर (25 जून 2025)
सुशांत घाटे
💢💢💢💢💢💢
चंद्रपूर जिल्ह्यातील नुकत्याच जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उप निरीक्षक पदाच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केल्या आहे.
बल्लारपूर येथील ठाणेदार श्याम गव्हाणे यांची काही महिन्यातच उचलबांगडी करत त्याच्या ठिकाणी विपीन इंगळे यांना बल्लारपूर ठाण्याचा पदभार देण्यात आला.कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून विपीन इंगळे यांची खास ओळख असल्याने त्यांना ही जवाबदारी देण्यात आली आहे.

🔅चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना अर्ज शाखा तसेच अतिरिक्त भरोसा सेल च्या पोलीस निरीक्षक पदी बहाल करण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी सायबर चे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांची वर्णी लावण्यात आली आहे. शिस्तप्रिय पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची खास ओळख आहे. निशिकांत रामटेके आणि प्रभावती एकुरके यांचे नाते पती-पत्नी आहे हे विशेष!

⭕भद्रावती च्या ठाणेदार लता वाढीवे यांना सायबर सेल ची पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मोठी जवाबदारी देत पहिल्यांदाच महीला अधिकाऱ्यांची नियुक्ती या ठीकानी केली आहे.
जिल्ह्यातील वाढत्या सायबर च्या घटना क्रमाने पोलीस विभागासमोर आव्हाण निर्माण केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सायबर सेल या गुन्ह्यांना कशे हाथाळणार हे पाहणे कौतुकाचे ठरणार आहे. वाडीवे यांच्या ठिकाणी योगेश पारधी याची वर्णी लावण्यात आली आहे.

🔅तळोधी येथील महीला ठाणेदार संगीता हेलोंडे यांची सुद्धा वरोरा येथे बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या हेलोंडे यांचा कार्यभार इतर ठाण्याच्या तुलनेत कमतरतेत आढळला गेला असल्याने त्यांना ठाणेदार पदावरून निरस्त केल्याचे पोलीस दलात बोलल्या जात आहे.त्यांच्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले उमरी पोतदार पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल गुहे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

⭕सिंदेवाही पोलीस स्टेशन ला जिवती चे ठाणेदार कांचन पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर जिवती ला सिंदेवाही चे विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🍁कोरपना पोलीस स्टेशन चे ठाणेदार दारासिंग राजपूत यांची मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी सुनील गाडे यांची वर्णी लावण्यात आली आहे. गाडे हे अत्यंत अनुभवी पोलीस निरीक्षक म्हणून जिल्हा पोलीस दलात ओळखल्या जाते. या आधी रामनगर, बल्लारपूर पोलीस ठाण्याचा चार्ज सुद्धा गाडे यांनी सांभाळला आहे. LCB च्या प्रमुख दावेदार पदी सुनील गाडे यांचे नाव प्रथम क्रमांकावर होते. मात्र चुकीच्या एका प्रकरणात त्यांचे नाव गोवल्याने त्याच्यावर कारवाई चा ससेमीरा करण्यात आली होती. मात्र शेवटी त्या कारवाईला समोर जात गाडे यांनी क्लीन चिट पटकवली मात्र तो पर्यंत गाडे यांच्या हातून विशेष संधी चालल्या गेली होती. आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या कोरपना तालुक्यातील क्षेत्राला अनुभवी ठाणेदार पहिल्यांदाच मिळाला असल्याने मोठा मान मिळाला असल्याचे जनसामान्य नागरिकांत चर्चा आहे.

⭕या सोबतच भिसी पोलीस ठाण्यातील प्रभार शहर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. शहर गुन्हे शाखेच्या कार्यकाळात भोंगळे यांची उत्तम कारकीर्द राहली आहे. गुन्ह्याचा तपास जलदगतीने करण्यात भोंगळे यांचे नाव घेण्यात येते. त्यांना बढती देत पोलीस अधीक्षक यांनी त्यांची भिसी ठाण्यात ठाणेदार म्हणून वर्णी लावली आहे.

💢निशा भुते ची अती सवेंदनशील असणाऱ्या ठाण्याला एन्ट्री!

👉पोलीस दलातील झालेल्या फेरबदलात सर्वात महत्वाचे अतिसावेंदशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराज्य सीमे वरती लाठी पोलीस स्टेशन ला महीला अधिकाऱ्याची पहिल्यांदा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चालेंजिंग लेडी ची ठाणेदार पदी वर्णी लावली आहे. आंतरराज्य सीमे वरती जनावर तस्कर, तांदूळ तस्कर, सुंगधित तंभाखू ची तस्करी रोखण्यासाठी पहिल्यांदा महीला ठाणेदार च्या रूपात निशा भुते ला पदभार देण्यात आला आहे. नागपूर शहर, मोहदा आणि रामटेक पोलीस स्टेशन ला डॅशिंग काम करून अनेक गुन्ह्याचा बाहुबली तपास करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते राजुरा पोलीस स्टेशन मधून थेट ठाणेदार पदाची बढती देण्यात आली आहे. नक्सल चा रेस्ट झोन म्हणून एके काळात ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिपरी भागातील सीमावर्ती भागातील लाठी हा परिसर विशेष आहे. पोलीस अधीक्षक यांच्या पारदर्शी बदल्यातील कारभारतील हे एक उत्तम उदाहरणं असल्याचे पोलीस दलात बोलल्या जात आहे.

🔅SP ने बजावले कारणे दाखवा नोटीस ! त्यां महीला अधिकारी कौन?

⭕गुलदस्त्यात असणारी सर्वात मोठी बातमी म्हणजे, काही दिवसा अगोदर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी काही महीला अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. त्यात आपल्याला निलंबित का करण्यात येऊ नये असा शेरा सुद्धा असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
या कारणे दाखवा नोटीस मध्ये त्यां महीला अधिकारी कौन आहे? हे सध्या उजेडात आले नाही आहे मात्र या बदल्या मध्ये त्यांचे नाव आहे का हे पाहणे तितकेच खरे ठरणार आहे. नेमके कोणत्या कारणासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कारणे दाखवा नोटीस त्यां महीला अधिकाऱ्यांना बजावले आहे. आणि त्यां महीला अधिकारी कौन याचा शोध डेली पोस्टमार्टम लवकरच लावणार आहे!

 

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!