चंद्रपूर (11 जानेवारी )
⭐सुशांत घाटे
“बोगस “पत्रकारीतेचा मोठा तोरा घेऊन, चंद्रपूर जिल्ह्यात एक फौज च निर्माण झाली आहे. हे महारथी खिशात खास शैलीत ओळख पत्र,कोट, जॅकेट लावून भाड्याची चारचाकी घेऊन जिल्हाभर वसुली अभियान साठी पत्र कारितेच्या नावाखाली ठीक ठिकाणी फिरत आहे.
👉अधिकाऱ्यां पेक्षाही मोठा थाट यांचा या “बोगस” पत्रकारितेच्या क्षेत्रात अनुभवास मिळत आहे.
चंद्रपूर शहरातील युट्युब, पोर्टल च्या नावाखाली ह्या बोगस पत्रकारांनी आपले 500-1000 रुपयात ओळखपत्र तयार केले आहे आणि ठिकठिकाणी आम्ही पत्रकार आहो म्हणून आपले शिकारी अभियान जिल्हाभरात सुरु केले.
👉पत्रकारितेत न लिहिता येणाऱ्या घरकाम मिस्त्री, ड्राइवर, पेंटर,भंगार चोर, इलेक्ट्रिशियन, भंगार विकणारा अशा महारथी ची नवीन टीम सध्या पत्र कारीता क्षेत्रात उतरली असल्याने पत्रकारितेला धक्काचं बसलेला आहे.
यातील एक एक पत्रकारिते चे पितळ उघडे केले तर एकालाही अ चा ढ सुद्धा येत नाही, पण रुबाब असा दाखवतात की जसे हे CBI सारखे स्पेशल युनिट आहे की काय?
अशा बोगस पत्रकारितेने मात्र जमिनीवरच्या सत्य पत्रकारितेची गळचेपी होऊ लागली आहे. या बोगस आणि गिरगिट पत्रकारिता मुळे जे हाडाचे पत्रकार आहे त्यांचा हक्क हिरावला जातं आहे. या बोगस पत्रकारांना जर जिल्हा प्रशासनाने आवर घातला तर मोठी चैन च जिल्ह्यातून बोगस पत्रकारिता ची बाहेर उभी दिसेल
लोकशाही चा चौथा स्तंभ असणाऱ्या या पत्रकारिता क्षेत्रात अनेक दिग्गज पत्रकारांनी आपले अनुभव देत पत्रकारीता ला समाजात एका विश्वासाचे केंद्र बनवले. अनेक तरुण या क्षेत्रात आपले आयुष्य निर्माण करण्याकरिता आणि समाजातील समस्या चा आराखडा आपल्या लेखणीतून जागृत करीत असतात. मात्र आता या पत्रकारितेला काही भामट्यानी नासवले आहे.
- उठले सुठले की वसुली आणि ब्लॅक मेलिंग करीत या भामट्यानी जिल्ह्यातील कंपनी, व्यावसायिक यांना धारेवर धरले आहे. बस कोणत्याही कार्यक्रमांची पत्रिका किंव्हा तोंडानी कार्यक्रम असल्याचे सांगत देणगी द्या चा नारा बारा महिने यांनी सुतो वाच अभियान सुरु केला आहे.
खऱ्या पत्रकारी ते ला या भामट्यानी धक्का दिल्याने, या बोगस पत्रकारीते त ले त्यां पत्रकारिता च्या आड चेहरा मांडनाऱ्याचा डेली पोस्टमार्टम लवकरच उलगडा करणार आहे - To be continue…..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

