Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsभ्रष्टाचाराच्या बिळात बसलेल्या "नागराजांना" ACB बिन वाजवून बाहेर काढणार! जनविकास सेनेची तक्रार.....

भ्रष्टाचाराच्या बिळात बसलेल्या “नागराजांना” ACB बिन वाजवून बाहेर काढणार! जनविकास सेनेची तक्रार…..

चंद्रपूर – 7 मे 2025
सुशांत घाटे

🏵️”दारू ची बॉटल” उभी होताच म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातून दारूबंदी हटताच एक दो एक दो करत मद्य परवाने वाटपात घोळ, बेकायदेशीर, अनियमितता दाखवत, हफ्तेखोरी आणि परवाने वाटपात करोडो रुपयांची भ्रष्टाचार खेळी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता चांगलाच घाम फुटू लागला आहे!डेली पोस्टमार्टम ने याची पोलखोल करत भ्रष्टाचाराच्या आहारी असणाऱ्या अधिकारी आणि त्यांच्या वसुली मोहऱ्यांची सनसनी खुलासे केल्याने  आता त्याची दखल सामाजिक स्तरावरून घेण्यात येत आहे. आणि भ्रष्टाचार करून बिळात बसलेल्या या नागराजांची आता थेट तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे.

🍁जनविकास सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक यांच्या कडे तक्रार केली आहे.

🎯 या तक्रारी मध्ये त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भ्रस्टाचाराच्या चेहऱ्यात असणाऱ्या जगदीश उत्तम पवार(दुय्यम निरीक्षक, नागपूर विभागीय भरारी पथक),

अमित क्षीरसागर (दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूर)

मारोती पाटील, सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी यांची चंद्रपूर जिल्ह्यात असताना या महारथी नी केलेल्या भ्रष्टाचाराची रीतसर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सध्या यातील दोन दुय्यम निरीक्षक हे नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीन काम करीत आहे. या पैकी जगदीश उर्फ जय पवार हा विभागीय भरारी पथकात असून त्याला क्रिम बेल्ट म्हणून नागपूर चा ही चार्ज मेहेरबान असलेल्या विभागीय आयुक्त चासकर यांनी आर्थिक हितापोटी दिल्याचे गोपनीय सूत्र द्वारे माहिती मिळाली आहे?

🛜अल्पवधित करोडो रुपयांचा एम्पयार उभ्या करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील जय पवार यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ठोकला असून आज ही चंद्रपूर जिल्हायात त्यांच्या करोडोची चर्चा रंगत आहे?

🚦या सोबतच हफ्तेखोरीची आणि भ्रष्टाचाराची लथ लागलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील विकास बबन थोरात त्याचा हवालदार जगदीश म्हस्के सोबत चंद्रपूर जिल्ह्यातील भरारी पथकाचे ईश्वर वाघ, चंद्रपूर चे दुय्यम निरीक्षक अभिजित लिचडे यांचीही भ्रष्टाचाराच्या यादीत तक्रार ACB च्या महा संचालक यांच्याकडे प्रदीप देशमुख यांनी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या कडे ही काल राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकार यांनी याच अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे. आता एक दो एक दो करत भ्रष्टाचाराच्या तक्रारी चा आलेख सामाजिक स्तरावरून वाढत चालला आहे.
येणाऱ्या काही दिवसात या भ्रष्टाखोर अधिकाऱ्यांची उच्च न्यायालयात नार्को टेस्ट करण्या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!