चंद्रपूर -2 एप्रिल 2025
💢सुशांत घाटे💢
👉कोरपना पोलीस स्टेशन चा वादग्रस्त तत्कालीन ठाणेदार संदीप एकाडे ची दुर्गापूर पोलीस ठाणेदार पदी वर्णी लागली आहे.
🛞9 जून 2024 ला कोरपना तालुक्याच्या धानोली तांडा या गावातील युवकाला अत्यंत अमानुष मारहाण करीत, या ठाणेदाराने बेरी के नीचे गाणे म्हणत अश्लील आई बहिणीची त्या युवकाची इज्जत काढत दोन कर्मचाऱ्यांना घेऊन 50 बाजीराव चे पट्टे त्याच्या तळहाथावर, पाटीवर आणि पायावर जोरदार प्रहार केले होते.
🛞अत्यंत निष्टुर, हेकेखोर, मुजोर या ठाणेदारा च्या कहर ने संतापाची लाट कोरपना तालुक्यात निर्माण झाली होती.
तालुक्यातील संपूर्ण जनता या ठाणेदारा विरुद्ध एकवटली होती.
चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते त्यानंतर ठाणेदार एकाडे ला कंट्रोल रूम लालगत केल होत.
तरी मात्र तत्कालीन ठाणेदार संदीप एकाडे चा तोरा काई कमी नव्हता झाला!
👉बोगस गुन्हे नोंदवणे, त्यातून पैशाची मागणी करणे असे अनेक आरोप असणाऱ्या एकाडे वर ACB ची नजर सुद्धा होती.त्यातून तो अलगद वाचला ही?
कितीतरी आरोपांच्या फैरीत असणाऱ्या या ठाणेदाराला अतीसवेंदनशील पोलीस स्टेशन देण्यात आल्याने पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
💢वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली होताच पेढे वाटले होते!
👉यवतमाळ जिल्हायातील वणी मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक असताना संदीप एकाडे याला कामाच्या बाबतीत पोलीस निरीक्षकाने कानउघाडनी केली होती. कुठल्याही कामाच्या बाबतीत आळस निर्माण करणे, आणि तपास दिला तर पूर्ण न करणे अशा काही कामचोर बाबीवरून त्या वेळेच्या वणी येथील ठाणेदाराने एकाडे ला सुनावले होते.
🛞एकाडे ने मनात राग धरून,काही अवैध व्यावसायिक लोकांना हाताशी धरून आमदारा मार्फत दुसऱ्या अधिकाऱ्याला वणी पोलीस स्टेशन ला ठाणेदार बदलविण्याचा केविलवाण्या प्रयोगा मध्ये एकाडे सुद्धा शामिल झाला होता?
त्या ठाणेदाराची तडकाफडकी बदली चे आदेश येताच पोलीस स्टेशन मधुन सुसाट वेगाने बिकानेरी च्या दुकानात जात एक किलो पेढे या अधिकाऱ्याने घेत पोलीस स्टेशन च्या आवारात वाटले होते!
⚛️⚛️
त्यानंतर कालांतराने चक्र बदलले आणि तोच अधिकारी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला.
कुठलेही आरोप न होता पोलीस विभागातील नौकरी करीत त्या ठाणेदाराने नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातून सेवानेवृत्ती घेतली.
मात्र एकाडे ने केलेला प्रकार त्यांना मनात धक्का देऊन गेला होता? कधीही असा अधिकारी कोणाला ही भेटू नये असे त्यांचे नेहमी उदगार होते!
👉एकाडे चे चौकशी चे काय झाले?
मानवीय जातीला काळीमा फासणाऱ्या कृत्याच्या चौकशीचे काय झाले ते अद्याप गुलदस्त्यात आहे!
बेरहमी नी मारणाऱ्या या ठाणेदारा वर गंभीर आरोप असताना, त्याला दुर्गापूर पोलीस स्टेशन चा पदभार दिल्याने पोलीस विभागात चर्चेला उधाण आले आहे.
चांगल्या दर्जाचे अधिकारी असताना अशा बेपर्वाह अधिकाऱ्यांची वर्णी लावल्याने पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांनी नाराजीचा सुर घेतला आहे.
दुर्गापूर वर्णी लागताच झटपट जाऊन ठाणेदार संदीप एकाडे नी चार्ज घेतला आणि आनंदाचा सुर गवसला मात्र त्या युवकाच्या वेदनेचे काय? त्याचे उत्तर अजूनही अनउत्तरित आहे!
……….to be continue 🛞🛞🛞
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

