चंद्रपूर – 22 ऑगस्ट
सुशांत घाटे
✨मनसे प्रमुख राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विदर्भ एक्सप्रेस मुंबई वरून गाठत पहिले गोंदिया येत,नंतर गडचिरोली जिल्ह्याची चाचपणी करीत आज चंद्रपूरातील मनसे पक्षाची चंद्रपूरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत चंद्रपूर आणि राजुरा विधानसभे संदर्भात उमेदवार यांची घोषणा केली.
👉त्यानंतर ते निघून गेले असताना मोठा गदारोळ निर्माण झाला,राजुरा विधानसभा क्षेत्रातील चंद्रप्रकाश भोयर आणि सचिन भोयर यांच्या कार्यकर्त्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाल्याने मोठी तारांबळ उडाली.
👇चंद्रप्रकाश भोयर हे मनसे पक्षात सुरवातीपासून आपले ध्येय राबवत पक्षाशी एक निष्ठ राहिले मात्र आज त्यांचा विधानसभा निवडणुकीत तिकीट वरून, भ्रमनिरास झाल्याने कार्यकर्त्यात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने त्यांचा तोल सुटला आणि राजुरा विधानसभेत सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने बाहेर चा उमेदवार काय हा प्रश्न?धरून तुफान राडा झाला?
👉राज ठाकरे हे विदर्भ एक्सप्रेस नीं गोंदियात विदर्भ एक्सप्रेस घेऊन वेळेवर पोहचले मात्र विदर्भातील कार्यकर्त्यांच्या ज्वाला चंद्रपूरातून ठीनग्या घेऊन राड्यात झाल्याने मनसे पक्षात सध्या विदर्भ मनसे ज्वालामुखी झाल्याचे दिसत आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

