Saturday, June 6, 2026
HomeBreaking News" चिल्लर " प्रशांत कोरटकर चंद्रपुरात येताच ब्रेक डाउन!

” चिल्लर ” प्रशांत कोरटकर चंद्रपुरात येताच ब्रेक डाउन!

चिल्लर प्रशांत कोरटकर चंद्रपूर येताच ब्रेक डाउन!

चंद्रपूर – 29 मार्च 2025

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या चिल्लर प्रशांत कोरटकर चा कोल्हापूर पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याला तेलंगणा राज्यातील मंचरियल इथून फरार असताना हॉटेल मधुन अटक केली आहे.

🌟MH05 CZ4455  गाडीचे रहस्य…

प्रशांत कोरटकर वर कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्या नंतर त्याने अंतरीम जमानत घेत वातावरण गरम असल्याने नागपुरातून पळता पाय काढत चंद्रपूर च्या दिशेने धाव घेतली त्यात त्याचा सहकारी प्रशिक पडवेकर पण सोबतच होता.

https://youtu.be/CjVQ4hruvBg ( बघा धीरज चौधरी काय बोलला तर )

11 मार्च रोजी नागपुरातून मर्सडिझ गाडी क्रमांक MH-05 CZ 4455 घेऊन चंद्रपूर ला पोहचताच ती गाडी ब्रेक डाउन झाली. आता काय करावे सुचेनाचे झालेला कोरटकर यांने प्रशिक ला गाडी अर्रेज करायला लावले.राजकीय कार्यकीरदीतून सुरवात करणाऱ्या
प्रशिक पडवेकर हा चंद्रपूर चा असल्याने त्याची मित्र मंडळी  बऱ्याच प्रमाणात चंद्रपुरात असल्याची कोरटकर ला माहिती होती.(MH05 CZ4455 ब्रेक डाउन गाडी टो करून नेताना…)

प्रशिक नी लावला धीरज चौधरी ला फोन…

गाडी ब्रेक झाल्याचे सांगत चंद्रपूरातील धीरज चौधरी ला प्रशिक ने मित्र नात्याने फोन लावत त्याच्या गाडीची चंद्रपूर शहरात फिरण्यासाठी आवश्यकता असल्याचे सांगितले. दहा वर्षांपासून मित्रता असणाऱ्या धीरज ने गाडी घरी आहे तू घेऊन जा म्हणून सांगितले.

नंतर त्याच्या गाडीचा वापर करीत प्रशिक आणि कोरटकर यांनी चंद्रपूरातील नामांकित असलेल्या सिद्धार्थ प्रीमियम हॉटेल ला रूम बुक करत तळ ठोकला!

11 मार्च ते 14 मार्च पर्यंत याच हॉटेल ला राहिल्याने धीरज चा सम्पर्क प्रशिक सोबत गाडी च्या निमित्याने होता मात्र कोरटकर असल्याची माहिती तो पर्यंत धीरज चौधरी ला  नव्हती.

रीतसर हॉटेल ला एंट्री करणाऱ्या कोरटकर कंपनी ने तीन दिवस चंद्रपुरात पाहुणचार करत होळी ला नागपूर च्या दिशेने प्रवास केला.
मात्र धीरज चौधरी ला काही ठाऊक नसताना,त्याला दुविधा मध्ये अडकवून गेला सहज मित्रा च्या एका फोन वर गाडी देणे त्याला आज महागात गेले आहे!

कोरटकर प्रकरणाशी काहीही संबंध नसताना त्याला आता प्रसार माध्यमातून प्रहार करण्यात येत असल्याचे धीरज चौधरी सांगत आहे.
अंतरीम जमानती वर असलेल्या कोरटकर ची 18 मार्च रोजी न्यायालयाने जमानत रद्द केली. यानंतर चिल्लर कोरटकर हा फरार होत इकडे तिकडे ठिकाणे शोधू लागला व शेवटी कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने तेलंगणा राज्यातील मंचरियल जिह्यातून एका हॉटेल मधुन प्रशांत कोरटकर ला अटक केली.

कोल्हापूर पोलिसांची एक टीम दोन दिवसा अगोदर चंद्रपुरात तपासाकामी येऊन गेली. पोलिसांनी धीरज चौधरी आणि सिद्धार्थ प्रीमियम च्या संचालकाला 31 मार्च ला हजर राहण्याचे सूचना पत्र दिले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!