Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsमोठी बातमी पाऊस, थरकाप आणि हत्या! सहा तासाच्या आत LCB...

मोठी बातमी पाऊस, थरकाप आणि हत्या! सहा तासाच्या आत LCB ने बंदुकी सह दोन आरोपीना केली अटक

चंद्रपूर -24जुलै
सुशांत घाटे

💥💥💥

. चंद्रपूर जिल्ह्यातील एकाच महिन्यातील तिसऱ्या मोठ्या घटनेने पोलिसांची चांगलीच मोठी तारांबळ उडाली असताना राजुरा येथील हत्येच्या घटनेने पुन्हा जिल्हा हादरावला आहे. मात्र पोलिसांच्या मोठ्या शिताफतीने या वेळेस या हत्येतील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करीत सहा तासाच्या आत अटक करून वचक निर्माण केला आहे. चंद्रपूर फायरिंग, बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरण याची शाही सुखली नसताना राजुरा येथे भर चौकात गोळीबार करीत शिवज्योतसिंह देवल या 28 वर्षीय तरुणांची 23 जुलै रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडत हत्या करण्यात आली होती.
जुन्या वादातुन ही हत्या झाल्याचे लक्षात येताच पोलिसांचे तपास चक्रे त्या दिशेने लागले असताना पोलिसांना त्याचा सुगावा लागला, लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात त्यांचे पथके पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात सायबर सेल च्या मदतीने आरोपीच्या मागावर होते. पाऊस, थरकाप सुटला असताना LCB ने मोठ्या शिताफतीने बंदुकी आणि शस्त्रासह दोन आरोपीना ताब्यात घेत त्यांना अटकेत घेतले.आरोपी लल्ली शेरगिल व शगीर उर्फ मोनू कदीर शेख राहणार राजुरा या दोन आरोपीना LCB ने अटकेत घेत राजुरा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे. स्वतः पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन राजुरा येथे या घटनेचे गांभीर्य ओळखून ठाण मांडून बसले असताना,सक्त निर्देश देत आरोपीना चारही दिशेने शोधण्याचे निर्देश दिले, तपासचक्रे फिरवत सहा तासाच्या आत LCB ने आरोपीच्या मुसक्या आवरल्या आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!