नागपूर /यवतमाळ – सुशांत घाटे (19 जुलै ).
एक दोन नवे तर शंबराहून अधीक अवैध जुगार क्लब आणि वरळी मटक्याला “यवतमाळ” जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावा गावात अवैध धंद्यानी
ग्रासून सोडले असल्याने याला “अलिखित” दिली गेलेली पोलीस प्रशासनाची परवानगी म्हणायचे का असा प्रश्न सामान्य जनतेला पोलीस विभागा संधर्भात पडला आहे?
विदर्भात टॉप रिडींग वर चालणारे “जुगार क्लब” नी यवतमाळ जिल्ह्यातील तर नियमांची दानादिन करून टाकली असल्याचे दिवस रात्र चित्र दिसत आहे. चोवीस तास सुरु असणाऱ्या या जुगार क्लब ला अलिखित परवानगी चे आर्थिक “सावट” असल्याचे बोलल्या जातं आहे. मनोरंजन “क्लब ” चे लायसन्स जरी असले मात्र जुगाराचा डाव खेळण्यासाठी हा परवाना आहे का?
हे नियमात न बसणारे प्रश्न सामान्य जनतेत चर्चेत आले आहे.वरली मटक्या नी तर गावोगावी पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अड्डे बनवत त्या ठिकाणी चेंगळ, झेंडी मुंडी चे डावा वर लाखो, करोडो चा सट्टा फुललेला आहे?
कोळसा, क्रिकेट आणि सुंगधित तंबाखू तसेच अन्य अवैध व्यवसायाला या ठिकाणी आळा घालण्यात यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासन सपशेल फेल ठरले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सुरवातीस रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी कारवाई चा फास एक दीड महिना आवरला मात्र त्यानंतर त्यांची या अवैध व्यवसाया बद्दल कुठलीच मोठी कारवाई पहायला मिळाली नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी, पुसद, आर्णी, दारव्हा, दिग्रस, मारेगाव,नेर,राळेगाव, कळंब,बाबुळगाव,उमरखेड, घाटंजी, झरी, पांढरकवडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यानी पाय पसरवले आहे. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाने या अवैध धंद्याना दिलेला अलिखित परवाना म्हणजे कितीची वसुली यावर तर्क वितर्क लावण्यात येत आहे?
विदर्भात यवतमाळ जिल्हा हा “अवैधमाळ”जिल्ह्याच स्वरूप घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्र राज्याची पोलीस महासंचालक राश्मि शुक्ला यांच्याकडे लवकरच या संधर्भात मोठी यादीसहित (कुठून कीती) तक्रार करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
सध्या विदर्भात नागपूर ग्रामीण, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वगळता यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंद्याना आश्रय मिळत असल्याने विदर्भात यवतमाळ जिल्ह्याचे “अवैधमाळ” स्वरूप झाले असे बोलल्या जात आहे?
जिल्ह्यातील पोलीस यंत्रनेला ज्या अवैध धंदया्यांना मोडकळीस काढायला हवे, मात्र त्यातून आर्थिक लाभपोटी दरमहा करोडो ची उलाढाल या यवतमाळ जिल्ह्यातून होत आहे.त्याचे वाटेकरी याचा लवकरच उलगडा करण्यात येईल.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

