Wednesday, August 26, 2026
HomeBreaking Newsअतिक्रमण अधिकाऱ्याला हवे 20000? अतिक्रमण विभाग आहे की धनी क्रमण!

अतिक्रमण अधिकाऱ्याला हवे 20000? अतिक्रमण विभाग आहे की धनी क्रमण!

चंद्रपूर – 18 जुलै
महानगर पालिकेचा अतिक्रमण विभागाचा विळखा सध्या अतिक्रमण धारकांच्या कारवाईत आर्थिक विवेंनचनेचा फास आवरत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर येत आहे?

चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी “पंचबुद्धे “हे सध्या आर्थिक तडजोडी साठी सरसावले असल्याचे काही चंद्रपूरातील अतिक्रमित धारकांनी सांगितले आहे?..जर अतिक्रमण करून व्यवसाय करायचा असेल तर त्यास लक्ष्मी प्रसन्न करून अतिक्रमण अधिकाऱ्यास प्रसन्न करा असा रानमोकळीक मागणी याच विभागातील “मनीष” नावाच्या व्यक्तीकडून करण्यात येत आहे?

काही दिवसा अगोदर राम नगर येथील एका शैलेश  नावाच्या मटण विक्रेत्याचे अतिक्रमण च्या नावाखाली शहर मनपाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्याचे सामान जब्त करीत महानगर पालिकेला आणले जर सामान हवे असल्यास साहेबाना 20000 रुपये मोजावे लागेल असे म्हणताच शैलेश नी तिथे वाद घातला, संपूर्ण शहर च्या शहर अतिक्रमण च्या विळख्यात असताना हेतूपूरस्पर कारवाई करण्याचा डाव करणाऱ्या अधिकाऱ्यां विरोधात शैलेश नी याची तक्रार खासदार महोदयांना केली लगेच त्यांनी आपल्या खासगी सचिव (P. A)ला या संधर्भात सूचित केले, त्यानंतर शैलेश नी आयुक्ता ची भेट घेत घटना क्रम सांगत कायदेशीर रीत्या आपले सामान परत आणले मात्र 20000 रुपयाची मागणी करणारे अतिक्रमण विभाग हे आर्थिक तडजोडी चे केंद्र बनल्याचे अनेक व्यवसायिकानी आरोप केले आहे.

याच प्रकारे नागपूर रोड वरील पाणी टाकी परिसरात एका सेकंड हॅन्ड फोर व्हिलर चारचाकी विक्रेत्याला सुद्धा याच महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्याने महिन्याकाठी 20000 रुपयाची मागणी केली असल्याची विश्वासनीय माहिती आहे. अतिक्रमण विभागाचा आर्थिक तडजोडी चा फार्मुला सध्या सुपर हिट झाल्याचे पाहवयास मिळत आहे.

पहले हे करा न?

👉शहरातील गोल बाजार परिसरात बाजारात जाणाऱ्या रोड वर सुद्धा अतिक्रमण झाले असताना यांना कारवाई चा फास आवरता येत नाही? शहरात सर्वीकडे अतिक्रमण चे साम्राज्य असताना यांचा आर्थिक डाव चांगलाच अतिक्रमण विभागात सावरत आहे.

सामान्य जनता उदरनिर्वाह च्या साधणासाठी रस्त्याच्या कडेला आपले बस्थान घेऊन बसतात, मात्र त्यालाही न सोडणारे अतिक्रमण विभाग आपले काहीन काही हितसंबंध जोपसत हिरवी झेंडी देतात.

पंचबुद्धे यांना वारंवार कॉल करून सुद्धा ते फोन उचलत नसतात. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही प्रयत्न केला मात्र त्यांचा कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्याची अतिक्रमण कारवाई आणखी शहरात कीती अतिक्रिमित करेल हे येणारी वेळच सांगेल.

जर कुठलीही आपल्यास पैशाची मागणी होत असेल आणि तुम्ही त्रस्त झाले असेल तर याची थेट तक्रार चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे करावी.

ACB हेल्प लाईन क्रमांक 1064 अथवा DYSP मंजुषा भोसले 9322253372

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!