Tuesday, August 25, 2026
HomeBreaking News🇸 🇵  🇲 🇺 🇲 🇲 🇦 🇰 🇦  🇸 🇺 🇩 🇦 🇷 🇸 🇭 🇦 🇳  चे गुन्हेगारी ला कॉम्बिग करण्याचे आदेश! 24 तास ऍक्टिव्ह...

🇸 🇵  🇲 🇺 🇲 🇲 🇦 🇰 🇦  🇸 🇺 🇩 🇦 🇷 🇸 🇭 🇦 🇳  चे गुन्हेगारी ला कॉम्बिग करण्याचे आदेश! 24 तास ऍक्टिव्ह मोडवर पोलीस अधीक्षक

चंद्रपूर 10 जुलै –

पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर, जलद गतीने कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश!

💥जिल्हायात गुन्हेगारी प्रवृतीची रोखथाम करण्यासाठी डोकेदुखी जरी पोलिसांची वाढली असेल मात्र त्याला आवर घालण्याकरिता आता पोलीस अधीक्षक ऍक्शन @ 24 तास वर ऍक्टिव्ह झाले आहे.

जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी ला कंट्रोल करण्याकरिता त्यांनी पोलीस विभागाला कडक सूचना दिल्या आहे. रेकॉर्ड वर असलेल्या सर्व गुन्हेगारी यंत्रनेचे कॉम्बिग ऑपेरेशन करून त्यांना आळा घाला, तसेंच जिल्ह्यातील गुन्हेगारावरती करडी नजर सोबत त्यांची कार्यप्रणाली तपासण्याचे सूचना दिल्या. कुठलिही हयगय करणाऱ्यावर  अधिकाऱ्याला,कडक कारवाई चा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी काल विधानभवनात उचलून धरला मात्र त्या आधीच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतःची करडी नजर जिल्ह्यातील सर्व गुन्हेगारी फाईल जगतावर  फिरवली असून त्यांनी गुन्हेगारी यंत्रनेला ठेचण्याचे सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.

💥24 तास ऑन ड्युटी राहणारे पोलीस अधीक्षक..

.      नेहमी 24 तास ऍक्टिव्ह राहणारे चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची चांगलीच दौडभाग सध्या पाहावंयास मिळत आहे. एकीकडे सुरु असलेली पोलीस भर्ती तर दुसरीकडे जिल्ह्यातील घडत चाललेल्या गुन्हेगारी घडामोडी यावर ते सतत लक्ष केंद्रित करत आवश्यक सुचनेसह जातीने स्वतः त्या प्रकरणावर नजर ठेवून पाठपुरावा करीत आहे. मध्यरात्री दोन चा ठोका त्यांना पोलीस भरतीत  घेऊन चालला  तर दुसरीकडे रात्री चे बारा त्यांना गुन्ह्याच्या घडामोडी वर ऍक्टिव्ह ठेव्हत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणाली ची पोलीस खात्यात ऍक्टिव्ह 24 तास पोलीस अधीक्षक म्हणून चांगलीच चर्चा रंगली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!