Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsचंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 'नंगानाच'! कागदावर बार, खिशात लाखो रुपये; भ्रष्ट...

चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ‘नंगानाच’! कागदावर बार, खिशात लाखो रुपये; भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळ्यात फेकली धूळ!

चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ‘नंगानाच’! कागदावर बार, खिशात लाखो रुपये; भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळ्यात फेकली धूळ!

चंद्रपूर – 29 मार्च 2026(सुशांत घाटे )

​सत्तेची ऊब आणि पैशाची मस्ती चढली की सरकारी अधिकारी कायद्याला स्वतःच्या घराची ‘जागीर’ समजायला लागतात, याचा जिवंत पुरावा म्हणजे चंद्रपूरचे राज्य उत्पादन शुल्क विभाग! ज्या विभागाने महसूल गोळा करायचा, तो विभाग आता ‘भामट्या’ आणि ‘दलाल’ अधिकाऱ्यांचा अड्डा बनला आहे. ‘अर्थकारण’ झालं की नियम धाब्यावर बसवून, शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया या भ्रष्ट टोळीने साधली आहे!

💢ना रेस्टॉरंट, ना बार काउंटर, ना टेबलं, ना खुर्च्या, ना खिडक्या, ना बाथरूम… तरीही ‘बार’ सज्ज! राजवटेंचा ‘काळा’ प्रताप!

वरोरा सर्कलच्या दुर्गापूरमधील रमेश बिसेन याच्या बारची फाईल म्हणजे भ्रष्टाचाराचा ‘कळस’ आहे! दुय्यम निरीक्षक प्रमोद राजवटे याने कसलीही शरम न बाळगता, जिल्हाधिकाऱ्यांसमोर असा अहवाल सादर केला जणू तिथे स्वर्गाचे सुख नांदतेय. वास्तव काय? ना तिथे हॉटेल आहे, ना टेबल, ना खुर्च्या, ना बाथरूम, ना बार काउंटर! चक्क उघड्या जागेला ‘आलिशान बार’ ठरवून राजवटेंनी कायद्याचे तीन-तेरा वाजवले आहेत. याला साथ देणारे निरीक्षक मोहितकर आणि अधीक्षक धार्मिक हे नेमके कोणाचे खिसे भरण्यासाठी एवढी रिस्क घेत आहेत?

​📸 गुगल मॅपवर सत्य, पण साहेबांच्या डोळ्यावर ‘नोट्यांची’ पट्टी!

डेली पोस्टमार्टम’ने २४ आणि २६ मार्च रोजी गुगल मॅप आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन या घोटाळ्याचा पंचनामा केला. जिथे साधी वीटही रचली नाही, तिथे कागदावर बार उभा राहिलाच कसा? राजवटे यांनी बनावट फोटो जोडून चक्क जिल्हाधिकारी विनय गौडा यांची दिशाभूल केली आहे. प्रामाणिक लोकांच्या फायलींवर ‘धुळ’ झटकणारे हे अधिकारी, ‘अर्थकारण’ होताच वाऱ्याच्या वेगाने नाचरे मोरा सारख्या फायली जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर नाचवतात!

​💸 वसुलीचे गुर्गे, कलेक्टर ऑफिस चा तो कौन?

घुघुसचा ‘बंडू’ आणि दुर्गापूरचा ‘चंदू’… हे दोन दलाल म्हणजे या भ्रष्ट टोळीचे ‘कलेक्टर’ आहेत. दुर्गापूर आणि घुग्गुस अंतर्गत येणाऱ्या बार आणि देशी परवाना धारक आणि तडजोडीची रक्कम सोबत दरमहिन्याला लाखो रुपयांची एन्ट्री खाणाऱ्या अधिकाऱ्याचे हे प्रमुख गुर्गे आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात अनागोंधी कारभारावर बेशरम अधिकाऱ्यांची हिंमत एवढी वाढली आहे की, आता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका ‘माशा’ला गळाला लावले आहे. प्रत्येक फाईलमागे लाखो रुपयांची सुपारी घेऊन हिरवा कंदील मिळवला जातोय. तो ‘कोण’ आहे? याचा खुलासा आता थेट मुंबईच्या ACB (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) कार्यालयात होणार आहे!

[👺 राजुराचा ‘अभिनंदन’ की भ्रष्टाचाराचा ‘अभिनंदन’?

​राजुरा येथील निरीक्षक अभिनंदन कांबळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असूनही त्यांना ‘क्लीन चिट’ मिळण्याचे गूढ काय? नूतनीकरणाच्या नावाखाली चक्क ‘रेटकार्ड’ लावून बसलेल्या या अधिकाऱ्याला कुणाचे अभय लाभले आहे? राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांना या अनागोंदीचा विसर पडला आहे का?

: ​⚡ मुनगंटीवारांच्या ‘गडावर’च भ्रष्टाचाऱ्यांचे ‘अंबर दिवे’!

​ज्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी सुधीर मुनगंटीवार आहेत, तिथेच त्यांच्या नाकाखाली हे भामटे अधिकारी लुटालूट करत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना खडेबोल सुनावणाऱ्या मुनगंटीवारांच्या भागात बनावट अहवाल देण्याची हिंमत या अधिकाऱ्यांमध्ये आली कुठून? फडणवीस सरकारच्या काळात या भ्रष्ट टोळीचा हिशोब होणार की हे अधिकारी जनतेला असेच लुटत राहणार?

जर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या २८ बारच्या जागांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले, तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मुखवटे फाटल्याशिवाय राहणार नाहीत. भ्रष्टाचाराच्या या ‘काळ्या अध्यायाचे’ पुरावे आता जनतेच्या न्यायालयात आणि ACB च्या दरबारात हजर होणार आहेत!

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!